World Elephant Day Dainik Gomantak
ग्लोबल

World Elephant Day: बेकायदेशीर तस्करीत दरवर्षी 20000 हत्ती गमवतात जीव; यावर्षीच्या थीममधून मोठा संदेश

World Elephant Day: 2 ऑगस्ट हा दरवर्षी आतंरराष्ट्रीय हत्ती दिवस म्हणून साजरा करतात.

दैनिक गोमन्तक

World Elephant Day: 12 ऑगस्ट हा दरवर्षी आतंरराष्ट्रीय हत्ती दिवस म्हणून साजरा करतात. हत्तींचे संवर्धन आणि सुरक्षेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा करतात.

हत्तींची शिकार, हत्ती आणि मानव यांच्यातील संघर्ष, त्यांचा अधिवास नष्ट होणे आणि हत्तींचा आशिय़ा आणि अफ्रिकेतील संघर्षाबद्दल जनसामान्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी हा दिवस साजरा करतात.

  • पहिल्यांदा कधी साजरा केला हत्ती दिवस?

थायलंडच्या एलिफंट रीइंट्रोडक्शन फाउंडेशन आणि कॅनेडियन चित्रपट निर्माते पॅट्रिशिया सिम्स आणि मायकेल क्लार्क यांनी एकत्र येत 2012 मध्ये प्रथम जागतिक हत्ती दिन सुरू केला. सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्व असलेल्या प्रतिष्ठित आशियाई हत्तीचा सन्मान करण्यासाठी 12 ऑगस्ट ही तारीख निवडण्यात आली होती.

हा दिवस संस्था, सरकार आणि व्यक्तींना एकत्र येण्यासाठी, ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी आणि हत्ती आणि त्यांच्या अधिवासाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने पुढाकार घेण्याचे व्यासपीठ तयार करतो.

2023 च्या जागतिक हत्ती दिवसाची थीम “Ending the Illegal Wildlife Trade". म्हणजेच बेकायदेशीरपणे वन्यजीवांच्या होणारा व्यापारावर बंदी अशी ठेवण्यात आला आहे. बेकायदेशीर व्यापारमुळे दरवर्षी 20000 हजारापेक्षा जास्त हत्ती मारले जातात.

  • अशा प्रकारे साजरा करा जागतिक हत्ती दिन

1. हत्तींसमोरील आव्हानांबद्दल अधिक जाणून घ्या.

2. हत्तींच्या संवर्धनाला मदत करणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा.

3. हत्तींच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांना मदत करा.

हत्तींविषयी आणखी जागरुकता निर्माण करण्यासाठी सोशल मिडियाचादेखील प्रभावीपणे वापर करु शकता. प्राणी आणि मानव निसर्गातील महत्वाचे घटक असल्याने या दोन्हींचे अस्तित्व गरजेचे आहे.

त्यामुळे मानव-प्राणी हा संघर्ष अटळ असला तरीही विविध उपययोजनांद्वारे मानव प्राण्यांचे संवर्धन आणि संरक्षण करु शकतो आणि प्राण्यांचा अधिवास टिकवण्यासाठी मदत करु शकतो. अलिकडे प्राण्यांची दिवसेंदिवस कमी होत जाणारी संख्या चिंताजनक असल्याने प्राण्यांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्व केले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Viral Video: पाकिस्तानी तरुणीची देशभक्ती पाहून लोक थक्क, स्वातंत्र्य दिनी गायलं 'भारतीय गाणं'; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT