world biggest ship Dream Line-2 Twitter
ग्लोबल

जगातील सर्वात मोठे क्रूझ निघाले भंगारात, खरेदीदार लावतायेत कवडीमोल किंमत

क्रूझ जहाजावरील पार्ट्या खूप प्रसिद्ध आहेत आणि प्रवासाचा रंग कोणाचेही मन आनंदित करू शकतो.

दैनिक गोमन्तक

क्रूझ जहाजावरील पार्ट्या खूप प्रसिद्ध आहेत आणि प्रवासाचा रंग कोणाचेही मन आनंदित करू शकतो. पण आता जगातील सर्वात मोठे क्रूझ जहाज भंगारात पडले आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे यासाठी कोणीही खरेदीदार सापडत नाही आणि मालकाकडेही पर्याय उरलेला नाही. कंपनी आता हे जहाज विकत घेण्यासाठी कोणी तयार होईल याची वाट पाहत आहे. (World Biggest Cruise Ship)

जहाजाचा मालिक दिवाळखोर

ड्रीम लाइन-2 असे या क्रूझ जहाजाचे नाव असून ते विकण्याची अनेक दिवसांपासून तयारी सुरू आहे. जर्मन क्रूझ इंडस्ट्रीशी संबंधित नियतकालिक एन बोर्डने म्हटले आहे की, जेव्हा कोणी खरेदीदार सापडत नाही तेव्हा ते भंगारच्या किमतीला विकत आहे. हे असे होत आहे कारण जहाज बनवणारी कंपनी आता पूर्णपणे कर्जात बुडाली आहे आणि कंपनीचा मालक दिवाळखोर झाला आहे. अशा परिस्थितीत त्याला हे जहाज विकून आपले कर्ज कसेतरी कमी करायचे आहे.

जहाज बनवणाऱ्या कंपनीने सांगितले की, या जहाजासाठी खरेदीदार न मिळाल्याने आता ते भंगारच्या किमतीत विकले जाण्याची शक्यता आहे. Brinkman & Partners या कंपनीचे मालक क्रिस्टोफ मॉर्गन यांना बँकेने दिवाळखोर घोषित केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हाँगकाँगची कंपनी जेटिंग आणि जर्मन शिपबिल्डर्स मिळून हे आलिशान क्रूझ जहाज बनवत होते. मात्र जानेवारी महिन्यात या दोघांनी स्वतःला दिवाळखोर घोषित करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. या दोन कंपन्या मिळून आलिशान क्रूझ जहाजांची मालिका बनवत होत्या, त्याचप्रमाणे ड्रीम लाइन-2 ही जेटिंग कंपनीच्या मालकीच्या तीन क्रूझ मालिकांपैकी एक आहे.

खरेदीदारांनी लावली कौडीमोल किंमत

जर्मनीतील विस्मार येथे एका डॉकवर उभ्या असलेल्या या क्रूझ जहाजाचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की सुरुवातीला काही लोकांनी जहाज खरेदी करण्यात रस दाखवला होता, परंतु त्यांची बोली खूपच कमी होती आणि त्यातून जहाजाची किंमत काढणे कठीण होते. मात्र आता जवळपास पूर्णपणे न विकल्या गेलेल्या अवस्थेत तयार असलेल्या या जहाजाला भंगारच्या किमतीत विकण्याचा निर्णय कंपनी मालकाला घ्यावा लागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ladakh Violence Explained: भारताच्या मुकुटरत्नाची धग, लडाखमधील हिंसाचार आणि सोनम वांगचुक

Mumbai: खिलाडी अक्षय कुमारच्या मुलीकडे मागितले होते अश्लील फोटो, त्यानेच सांगितला प्रसंग; मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली मोठी मागणी Video

पाकिस्तानी क्रिकेटर म्हणतो, 'जगाला RSS सारख्या संघटनांची गरज'; नेटकऱ्यांनी दिला तिथं शाखा उघडण्यांचा सल्ला

Goa Vegetable Rates: दसऱ्यानंतर भाज्यांच्या किंमतीत बदल! रताळी, भुईमुगाच्या शेंगा बाजारात दाखल; जाणून घ्या ताजे दर..

Operation Sindoor: "एफ-16, जेएफ-17 सह पाकिस्तानची 10 विमानं पाडली" ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुखांचा मोठा खुलासा Watch Video

SCROLL FOR NEXT