World Bank Dainik Gomantak
ग्लोबल

World Bank ने दिला मोठा धक्का; भारताच्या ग्रोथ रेटचा अंदाज केला कमी, जाणून घ्या?

Economic Growth: जागतिक बँकेने मोठा धक्का दिला आहे.

दैनिक गोमन्तक

World Bank Forecast: जागतिक बँकेने मोठा धक्का दिला आहे. गुरुवारी जागतिक बँकेने ढासळत्या जागतिक परिस्थितीचे कारण देत भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज कमी केला आहे. ताज्या अंदाजानुसार, 2022-23 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 6.5 टक्के दराने वाढेल. जे जून 2022 च्या अंदाजापेक्षा एक टक्क्याने कमी आहे.

अहवाल जारी केला

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीपूर्वी जारी करण्यात आलेल्या अहवालात बँकेने म्हटले की, 'उर्वरित जगाच्या तुलनेत भारताच्या आर्थिक वाढीचा दर उत्तम आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 8.7 टक्के होता.'

इतर देशांपेक्षा चांगली कामगिरी केली

जागतिक बँकेचे (World Bank) दक्षिण आशियाचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ हंस टिमर यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्थेने दक्षिण आशियातील इतर देशांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे.

भारतावर कोणतेही विदेशी कर्ज नाही

ते पुढे म्हणाले की, 'भारतावर (India) कोणतेही मोठे विदेशी कर्ज नाही. या बाजूने त्याला कोणतीही अडचण नाही, आणि भारताचे आर्थिक धोरणही विवेकपूर्ण आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने विशेषतः सेवा क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे.'

अंदाज का कमी केला?

शेवटी ते म्हणाले की, 'असे असूनही, आम्ही चालू आर्थिक वर्षाचा अंदाज कमी केला आहे, कारण भारत आणि इतर बऱ्याच देशांसाठी आंतरराष्ट्रीय वातावरण बिघडत आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT