World Bank Report: भारताच्या GDP वाढीत घट होऊ शकते. जागतिक बँकेने याबाबतचा अहवाल जारी केला आहे. अहवालानुसार, 2023-24 मध्ये भारताच्या जीडीपी वाढीचा दर 6.3 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो. जो आधीच्या 6.6 टक्क्यांच्या अंदाजापेक्षा कमी आहे. जागतिक बँकेने मंगळवारी (इंडियन ग्रोथ रिपोर्ट) एका अहवालात हा दावा केला आहे.
भारताच्या (India) वाढीबाबत आपल्या ताज्या अंदाजात, जागतिक बँकेने म्हटले आहे की, उत्पन्नातील मंद वाढ आणि आव्हानात्मक बाह्य परिस्थितीमुळे वाढ कमी होऊ शकते. उत्पन्नातील मंद वाढ आणि महागड्या कर्जामुळे उपभोगाच्या वाढीवर परिणाम होईल, असेही अहवालात म्हटले आहे.
अहवालात म्हटले आहे की, चालू खात्यातील तूट 2023-24 मध्ये 2.1 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकते, जी तीन टक्के होती. महागाईबाबत अंदाज वर्तवण्यात आला आहे की, ती 6.6 टक्क्यांवरुन 5.2 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकते.
यासोबतच, जागतिक बँकेने (World Bank) आज भारताशी संबंधित इंडिया डेव्हलपमेंट रिपोर्ट जारी केला. रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की, भारताची वाढ आणखी लवचिक राहील, परंतु यानंतरही अर्थव्यवस्थेत सुधारणा दिसू शकते.
यावेळी, जागतिक स्तरावर अनेक प्रकारची आव्हाने पाहायला मिळत आहेत. या काळातही भारत विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये कायम आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.