Pakistan Food Crisis Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Crisis: पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिघडली, 1 किलो मैद्याच्या किमतीने...

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे. येथे लोक अन्नासाठी वणवण भटकत आहेत.

दैनिक गोमन्तक

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे. येथे लोक अन्नासाठी वणवण भटकत आहेत. इथल्या लोकांना पीठ, दूध, तांदूळ यासारख्या वस्तूही मिळत नाहीत. या सगळ्यात जागतिक बँकेने पाकिस्तानच्या विकास दरात मोठी घसरण होण्याचा अंदाज वर्तवला आहे. चालू वर्षात (2022-23) पाकिस्तानचा आर्थिक विकास दर दोन टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे.

विकास दर आधीच्या अंदाजापेक्षा कमी असेल

जून 2022 च्या अंदाजापेक्षा तो दोन टक्के कमी आहे. जागतिक बँकेच्या (World Bank) ग्लोबल इकॉनॉमिक आऊटलूक अहवालात म्हटले की, भीषण पूर आणि जागतिक विकास दरातील घसरणीमुळे पाकिस्तानचा विकास दर पूर्वीच्या अंदाजापेक्षा कमी असेल.

अहवालात उघड झाले

पाकिस्तानच्या 'डॉन' या वृत्तपत्राने बुधवारी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, जागतिक बँकेचा हा अहवाल दीर्घकाळ चालणारी मंदी दर्शवतो. या वर्षी जागतिक विकास दर 1.3 टक्के राहील, असे अहवालात म्हटले आहे. जूनमध्ये जागतिक विकास दर तीन टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

महागाई 24.5 टक्क्यांवर पोहोचली

जागतिक बँकेच्या एका अग्रगण्य प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की, उच्च चलनवाढ, उच्च व्याजदर, गुंतवणुकीचा अभाव आणि युक्रेन-रशिया युद्धामुळे निर्माण झालेल्या व्यत्ययामुळे जागतिक वाढ झपाट्याने खाली येत आहे. यासह पाकिस्तानमधील (Pakistan) महागाई 24.5 टक्क्यांवर पोहोचली आहे.

एक किलो पिठाची किंमत 150 रुपये आहे

पाकिस्तानमध्ये पिठाची किंमत 150 रुपये प्रति किलोच्या पातळीवर पोहोचली आहे. येथे 15 किलो पिठाची पोती 2250 रुपयांना विकली जात आहे. यासोबतच लाहोरमध्ये पिठाची किंमतही 145 रुपये प्रति किलोच्या पातळीवर पोहोचली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Marathi Konkani Language Debate: मराठी आणि कोंकणीच्या संघर्षातून भाजपचा राजकीय उदय

PM Kisan Scheme Update: 'पीएम किसान योजना' बंद होणार का? केंद्र सरकारनं स्पष्ट केला पुढील पाच वर्षांचा रोडमॅप

Coffee Health Research: रोज कॉफी पिल्यास आयुष्य खरंच वाढतं? नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक आणि महत्त्वाची माहिती

Bandoda Jain Settlement: बांदोड्यातील प्राचीन जैन वस्ती आणि विजयनगर साम्राज्याचे सुवर्णयुग

Canacona Mega Housing Project: देळेत गृहनिर्माण प्रकल्पाला तीव्र विरोध; 15 दिवसांत निर्णय न घेतल्‍यास उपोषणाचा इशारा

SCROLL FOR NEXT