Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात झालेल्या शक्तिशाली भूकंपात 1,000 लोक ठार झाले आहेत. तर शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. अफगाण अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. देशाच्या पूर्व पक्तिका प्रांतात हा भूकंप झाला असून, त्याची तीव्रता 6 रिस्टर स्केलची होती.
AFI या वृत्तसंस्थेनुसार, पक्तिकामधील अधिकारी मोहम्मद अमीन हुजैफा यांनी सांगितले की, 'लोक कबरी खोदत आहेत.' ते म्हणाले पुढे की, 'एकट्या पक्तिका प्रांतात 1,000 लोक मरण पावले आहेत. त्यामध्येच पाऊस पडत असल्याने घरांची पडझड होत आहे.' लोक अजूनही ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, असा इशारा देशाचे सर्वोच्च नेते हिबतुल्ला अखुंदजादा (Hibatullah Akhundzada) यांनी दिला आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या (Pakistan) हवामान विभागाने सांगितले की, ''भूकंपाचा (Earthquake) केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या (Afghanistan) पक्तिका प्रांतातील खोस्ट शहरापासून 50 किमी आग्नेयेला होता. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने, ज्याने भूकंपाची तीव्रता 5.9 इतकी नोंदवली आहे. भूकंपाच्या केंद्राची खोली केवळ 10 किमी असल्याचे सांगण्यात आले आहे.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.