Woman dies after eating chocolate given by an astrologer who predicted her death in Brazil. Dainik Gomantak
ग्लोबल

Astrologer in Brazil: मृत्यूची भविष्यवाणी करणाऱ्या ज्योतिषाने दिलेले चॉकलेट खाल्ल्याने तरुणीचा मृत्यू

Palm Reader: वृद्ध पाम रीडरने भाकीत केले होते की, पिंटोकडे जगण्यासाठी फक्त काही दिवस आहेत. त्यावेळी वृद्ध पाम रीडरने पिंटोला एक चॉकलेट भेट म्हणून दिले होते.

Ashutosh Masgaunde

Woman dies after eating chocolate given by an astrologer who predicted her death in Brazil: ब्राझीलमधील एका विचित्र प्रकरणात, फर्नांडा वालोज पिंटो नावाच्या एका तरुणीचा पाम रीडरने (ज्योतिषाने) दिलेले चॉकलेट खाल्ल्याने मृत्यू झाला आहे. या पाम रीडरने तिचा लवकरच मृत्यू होईल असे भाकीत केले होते. पिंटोचा गूढ मृत्यू ऑगस्टमध्ये झाला होता.

भविष्य सांगणार्‍यांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या Maceió येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. पिंटो शहराच्या मध्यभागातून जात असताना तिला एका वृद्ध महिलेने थांबवले आणि तिचे भविष्य पाहाण्याचा आग्रह केला.

वृद्ध पाम रीडरने भाकीत केले होते की, पिंटोकडे जगण्यासाठी फक्त काही दिवस आहेत. त्यावेळी वृद्ध पाम रीडरने पिंटोला एक चॉकलेट भेट म्हणून दिले होते.

चॉकलेट खाल्ल्यानंतर पिंटोचा मृत्यू कसा झाला याची माहीती तिची चुलत बहीण बियान्का क्रिस्टिना हिने दिली.

“ चॉकलेट खाल्ल्यानंतर फर्नांडा व्हॅलोज पिंटोला उलट्या झाल्या, तिची दृष्टी थोडी अस्पष्ट झाली आणि काही तासांतच तिचे शरीर मऊ पडले,” असे क्रिस्टिनाने ग्लोबो1 ला सांगितले.

“ चॉकलेटचे पॅक पाहून तिच्या लक्षात आली नाही की, चॉकलेटमुळे कोणताही धोका होऊ शकतो. आणि तिला भूक लागली होती म्हणून तिने ते खाण्याचा निर्णय घेतला,” अशी माहिती क्रिस्टीनाने दिली.

चॉकलेट खाल्ल्यानंतर, पिंटोला अस्वस्थ वाटू लागले आणि तिने टेक्स्ट मेसेजद्वारे तिची परिस्थिती तिच्या कुटुंबियांशी सांगितली.

“माझे हृदय धडधडत आहे. मी उलटी केली आहे. पण माझ्या तोंडाला आलेली कडवट चव खूप वाईट आहे. माझी दृष्टी अंधुक झाली आहे. मी खूप अशक्त झाली आहे," असे पिंटोने मेसेजमध्ये सांगितले होते.

“मी पाण्याच्या टाकीवर टेकले आहे. माझा तोल जात आहे. मला माहित नाही माझ्यासोबत हे काय होत आहे,” असे पिंटो पुढे तिच्या मेसेजमध्ये म्हणाली.

दरम्यान, तिच्या शवविच्छेदनातून बायोसॅम्पल्समधून तयार करण्यात आलेल्या टॉक्सिकॉलॉजी रिपोर्ट्समध्ये तिच्या शरीरात सल्फोटेप आणि टेरबुफोस या कीटकनाशकांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले.

पिंटोच्या विषबाधेचे कारण चॉकलेटच होते का, याचा तपास सुरू आहे. पिंटोला मारण्यासाठी भविष्य सांगणाऱ्या महिलेल्या सुपारी दिली होती का? याचा तपास पोलीस करत आहेत.

“तिच्यासोबत असा प्रकार करण्याचे कोणाकडेही कारण असल्याचे मला दिसत नाही, परंतु कोणाच्याही मनात काय आहे? हे आपण सांगू शकत नाही. तिला मारण्याचा आदेश कोणीतरी दिला होता की त्या महिलेलाच तिला मारायचे होते म्हणून हे केले, हे फक्त पोलिस शोधून काढतील,” असे पिंटोची दुसरी चुलत बहीण लुमेनिता वालोज म्हणाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

America Firing: गोळीबाराने हादरले 'न्यूयॉर्क'! नाइट क्लबमध्ये बेछूट गोळीबार, 3 ठार, 8 जखमी

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT