European Parliament Dainik Gomantak
ग्लोबल

Winter Olympic 2022: युरोपचा चीनमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकवर बहिष्कार

चीनमध्ये (China) 2022 होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक (Winter Olympic 2022) खेळांचे आयोजन करीत आहे. हे आयोजन बीजिंगमध्ये (Beijing) करण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

चीन (China) 2022 होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक (Winter Olympic 2022) खेळांचे आयोजन करीत आहे. हे आयोजन बीजिंगमध्ये (Beijing) करण्यात येणार आहे. परंतु युरोपियन संसदेने (European Parliament) चीनला मोठा धक्का देत हिवाळी ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. चीनमधील मानवाधिकाराच्या उल्लंघनामुळे आपण बीजिंग 2022 च्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ नये, असा प्रस्ताव युरोपियन युनियनच्या खासदारांनी मांडला. युरोपियन विधिमंडळाने चीनमधील उइघूर मुस्लिमांशी (Uighur Muslims) होत असलेल्या छळाच्या वागणुकीचा संदर्भ दिला आहे.

युरोपियन संसदेनेही हाँगकाँगच्या सरकारी अधिकाऱ्यांवर बंदी घालण्याचा ठरावही मंजूर केला. चीनशी प्रत्यार्पण करार त्वरित संपुष्टात आणला पाहिजे आणि बीजिंग ऑलिम्पिकवर बहिष्कार घालण्यात यावा, असे विधिमंडळातील सदस्यांनी यावेळी सांगितले. युरोपियन संसदेत चीनच्या प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष जर्मनीचे रेनहार्ट बुटीकोफर यांनी हा प्रस्ताव मांडला. ते यावेळी म्हणाले की, युरोपियन संसदेत या मुद्द्यांबाबत एकमत झाले आहे. त्यांनी युरोपमधील सदस्य देशांना कठोर भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.

चीनने तीव्र विरोध व्यक्त केला

युरोपियन संसदेने मंजूर केलेला हा ठराव युरोपियन देशांना मान्य करण्यास बांधील नाहीत. बुटीकोफर म्हणाले की, युरोपमधील अनेक देश आणि युरोपियन कमिशन यांना हाँगकाँगमधील चीनच्या वर्तनावर भाष्य करण्याची इच्छा नाही. युरोपियन युनियन बर्‍याचदा चीनवर टीका करीत असते, तरीही अनेक युरोपियन सरकारांनी चीनशी थेट पंगा घेणे टाळले आहे.

दरम्यान, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या प्रस्तावाला कडाडून विरोध दर्शविला आहे. चीनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले की, आमच्या अंतर्गत प्रश्नामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी खेळ आणि मानवाधिकारांच्या मुद्द्यांचे राजकीयकरण करत ह्सतक्षेप करण्याला चीन तीव्र विरोध करतो. पुढे प्रवक्त्याने म्हटले की, राजकीय हेतूंसाठी बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकमध्ये व्यत्यय आणणे ही एक बेजबाबदार वृत्ती आहे. यामुळे खेळाडूंच्या आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकच्या हिताचे नुकसान होईल.

युरोपियन युनियनच्या प्रस्तावाने चीनला मोठा धक्का

युरोपियन संसदेचा हा प्रस्ताव पारित करणे चीनला मोठा धक्का देण्यात आला असल्याचे मानला जात आहे. चीन सतत युरोपशी संबंध दृढ करण्यात गुंतलेला आहे. खरं तर अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिका आणि युरोपमधील काही मुद्दे वादाचे कारण बनले होते. चीन या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करीत होता. युरोपमधील आपलं व्यापारी वर्चस्व बळकट करण्यासाठी चीनने सीईईसी कॉर्पोरेशनची स्थापना केली असून त्या मदतीने तो अनेक देशांना कर्ज देत आहे. दरम्यान, युरोपियन संसदेने मंजूर केलेला हा ठराव चीनसाठी वाईट बातमी मानला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ZIM: हरारेमध्ये श्रेयस अय्यरचा ऐतिहासिक पराक्रम! एमएस धोनीचा 14 वर्षे जुना रेकॉर्ड मोडीत; मैदानावर केला मोठा कारनामा

Pakistan Economic Crisis: पाकड्यांचा कॅनडाच्या तिजोरीवर डोळा! मिळाली 453 कोटींची मोठी 'भीख'; शाहबाज सरकारने भारताविरोधात ओकली गरळ

Alia Bhatt on Student Protest: 'विद्यार्थ्यांच्या धैर्याला, चिकाटीला सलाम...', आलिया भट्टचा CJP च्या आंदोलनाला उघड पाठिंबा Post Viral

VIDEO: माटणे-दोडामार्ग अपघातात मयेतील दुचाकीस्वार ठार

WTC 2027 Final: ICC ची मोठी घोषणा! 9 ते 13 जूनदरम्यान 'द ओव्हल'वर रंगणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना

SCROLL FOR NEXT