Israel Airstrike Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: 7 ऑक्टोबरलाच हमासने इस्रायलवर का केला हल्ला? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरुच आहे. शनिवारी हमासचे दहशतवादी जगातील सर्वात अभेद्य समजल्या जाणाऱ्या इस्रायलच्या सीमेत घुसले. त्यांनी शेकडो लोकांना ओलीस ठेवले आणि 600 हून अधिक लोकांची हत्या केली.

गेल्या अनेक दशकांत इस्रायलवर एवढा मोठा हल्ला झाला नव्हता. या हल्ल्याने संपूर्ण जग हादरले असून दहशतवादाचा सामना कसा करायचा या चिंतेत आहे.

दरम्यान, हमासच्या हल्ल्यानंतर 50 वर्षे जुन्या घटनेचाही उल्लेख केला जात आहे. एवढेच नाही तर हमासने हल्ल्यासाठी 7 ऑक्टोबर ही तारीख का निवडली याचीही चर्चा सुरु आहे.

खरे तर, 1973 मध्ये इस्रायलवर सीरिया आणि इजिप्तने हल्ला केला होता. इस्त्रायली लोक शबात साजरा करण्यात व्यस्त असताना 6 ऑक्टोबर रोजीही हा हल्ला करण्यात आला होता. ज्यूंसाठी ही एक धार्मिक सुट्टी आहे.

या दिवशी ज्यू समुदायाचे लोक प्रार्थना करतात आणि सुट्टी साजरी करतात. त्यामुळेच हमासने इस्रायलवर हल्ला करण्यासाठी हा दिवस निवडल्याचे मानले जाते.

6 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्याच्या एका दिवसानंतर म्हणजेच 7 ऑक्टोबर रोजी हा हल्ला करण्यात आला होता. 50 वर्ष जुन्या हल्ल्याच्या आठवणी हमाससाठी (Hamas) अजूनही ताज्या आहेत हे स्पष्ट आहे.

दरम्यान, 1973 मध्ये सीरिया आणि इजिप्तच्या हल्ल्यात इस्रायललाही अडीच हजार सैनिक गमवावे लागले होते. जरी शेवटी इस्रायलचा विजय झाला. ते युद्ध 'योम किप्पुर युद्ध' म्हणून ओळखले जाते.

त्यानंतर पहिल्यांदाच इस्रायलला (Israel) असे नुकसान सहन करावे लागले आहे. ज्यू देशावरील या हल्ल्याने अमेरिका, भारत आणि युरोपसह जगातील अनेक देशांना धक्का बसला आहे. इस्रायलने या हल्ल्याची तुलना अमेरिकेवरील 9/11 हल्ल्याशी केली आहे.

दुसरीकडे,1973 मध्ये इस्रायल आणि अरब देशांदरम्यान सुरु झालेले युद्ध 'चौथे अरब-इस्रायल युद्ध' म्हणून ओळखले जाते. या दोघांमध्ये यापूर्वी 1949, 1956 आणि 1967 मध्ये युद्ध झाले होते. 1967 मध्ये 6 दिवस चाललेल्या युद्धानंतर इस्रायलने आपल्या सीमांचा विस्तार केला.

सीरियातील गोलान हाइट्स आणि इजिप्तच्या सिनाईचा काही भाग इस्रायलच्या ताब्यात आला. त्यामुळे संतापलेल्या सीरिया आणि इजिप्तने 1973 मध्ये इस्रायलवर हल्ला केला.

हा हल्ला रमजानच्या महिन्यात झाला, ज्याची इस्रायलला अपेक्षा नव्हती. असाच हल्ला यावेळीही करण्यात आला, जेव्हा हल्ल्यासाठी धार्मिक उत्सवाचा दिवस निवडला गेला.

तसेच, 50 वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्याने इस्रायलला मोठा धक्का बसला होता. तीन दिवसांनी इस्रायलनेही पलटवार केला होता. त्यानंतर हे प्रकरण जागतिक पातळीवर पोहोचले होते.

अमेरिकेने इस्रायलला पाठिंबा दिला तर सोव्हिएतने इजिप्त आणि इस्रायलला पाठिंबा दिला होता. त्यानंतर अखेर 25 ऑक्टोबर रोजी UN मध्ये एक करार झाला आणि युद्धबंदी लागू करण्यात आली. या घटनेमुळे इस्रायलच्या अजिंक्य असण्याच्या समजालाही मोठी हानी पोहोचली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT