Tsai Ing-wen Resigns Dainik Gomantak
ग्लोबल

Tsai Ing-wen Resigns: तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी का दिला सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखपदाचा राजीनामा?

स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाचा मोठा पराभव, चीनवर संशयाची सुई

Akshay Nirmale

Tsai Ing-wen Resigns: तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग वेन यांनी सत्ताधारी डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. तैवानमधील स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाचा पराभव झाला आहे. त्यामुळे या पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारत वेन यांनी हा निर्णय घेतला आहे. तैवानमध्ये नेहमीच मोठ्या पराभवानंतर पक्षाचे प्रमुख राजीनामा देत असतात.

राजीनाम्यावेळी केलेल्या भाषणात वेन यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारली. कारण त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांची निवड त्यांनीच केली होती. त्यांनी समर्थकांचे आभारही मानले.

तैवानमध्ये 2024 मध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यापुर्वी होणारी ही स्थानिक निवडणूक राजकीय पक्षांसाठी शक्तीप्रदर्शनाची संधी म्हणून पाहिली जात होती. सकाळपासूनच मतदानात उत्साह दिसून आला. पण मतमोजणीनंतर मात्र सत्ताधारी पक्षाला झटका बसला आहे. तैवानच्या नागरिकांनी सर्व तेरा क्षेत्रांमध्ये आणि नऊ शहरांमधील महापौर, नगरपरिषदांचे सदस्य, स्थानिक नेत्यांच्या निवडीसाठी मतदान केले.

दरम्यान, तैवानमधील या घडामोडींना अनेक आंतरराष्ट्रीय राजकारणाचे विश्लेषक चीनच्या नजरेतून अभ्यासत आहेत. गेल्या काही काळात सातत्याने चीन-तैवान निर्माण झाला होता. त्या पार्श्वभुमीवर सत्ताधारी पक्षाचा पराभव चीनला बळकटी देणारा आहे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे तर इतर अनेकांनी मात्र या निवडणुकीत चीनचा काहीही हात नव्हता, असे म्हटले आहे.

काही महिन्यापुर्वी तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने चीन तैवानवर आक्रमण करण्याची तयारी करत असल्याचे म्हटले होते. त्या पार्श्वभुमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी चीनला इशारा दिला होता. चीनने तैवानवर आक्रमण केल्यास अमेरिका तैवानचे संरक्षण करेल, असे बायडेन म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT