North Korea

 

Dainik Gomantak 

ग्लोबल

उत्तर कोरियाला का आणावी लागली हसण्यावर बंदी ?

उत्तर कोरियाचे (North Korea) माजी हुकूमशहा किम जोंग-इल यांच्या 10व्या पुण्यतिथीनिमित्त देशात शुक्रवारपासून शोक काळ पाळण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

उत्तर कोरियाचे (North Korea) माजी हुकूमशहा किम जोंग-इल यांच्या 10व्या पुण्यतिथीनिमित्त देशात शुक्रवारपासून शोक काळ पाळण्यात येणार आहे. परिणामी, देशवासियांना हसणे, मद्यपान व खरेदी करण्यावर बंदी घातली आहे.

रेडिओ फ्री एशियाने दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत रहिवासी किराणा खरेदीसाठी जाऊ शकत नाहीत. नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांना (Citizens) अटक (Arrest) केली जाईल. "पूर्वी, शोक काळात मद्यपान करताना किंवा नशा करताना पकडलेल्या अनेक लोकांना अटक करण्यात आली होती व गुन्हेगार म्हणून वागणूक दिली गेली होती," असे अज्ञात नागरिक म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "यंदा किम जोंग-इल यांची 10वी पुण्यतिथी असल्याने हा शोक काळ 11 दिवस चालणार आहे. साधारणपणे, दरवर्षी 10 दिवसांचा शोक पाळला जातो. तुमच्या कुटुंबातील सदस्याचा शोक काळात मृत्यू झाला तरीही, तुम्हाला मोठ्याने रडण्याची परवानगी नाही. शोक कालावधीत लोक स्वतःचा वाढदिवस (Birthday) देखील साजरा करू शकत नाहीत."

किम जोंग इल यांचे 17 डिसेंबर 2011 रोजी वयाच्या 69 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. दरवर्षी किम जोंग उन (Kim Jong-un) आपल्या वडिलांच्या स्मृतीस्थळी आदरांजली अर्पण करतो. मात्र, यावर्षी राज्य माध्यमांनी किम बाबत कोणतेही वृत्त दिले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT