India-China Dainik Gomantak
ग्लोबल

चीनला भारताचा Chicken Neck करायचायं 'ब्रेक'? जाणून घ्या

सिलीगुडी कॉरिडॉर (Siliguri corridor) भारताचा 'चिकन नेक' (Chicken neck) म्हणून ओळखला जातो.

दैनिक गोमन्तक

सिलीगुडी कॉरिडॉर (Siliguri corridor) भारताचा 'चिकन नेक' (Chicken neck) म्हणून ओळखला जातो. 2017 मध्ये जेव्हा भारत आणि चीन दरम्यान डोकलामवरुन वाद (India-China Doklam crisis) उद्भवला, तेव्हा तो एक महत्त्वाचा मार्ग म्हणून उदयास आला. हा कॉरिडॉर पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) आहे. त्याची लांबी 60 किमी असून 20 किमी रुंद आहे. सिलीगुडी कॉरिडॉर ईशान्य भारताला उर्वरित भारताशी जोडतो. हा कॉरिडॉर केवळ एक महत्त्वाचा व्यापारी मार्गच नाही तर दक्षिण पूर्व आशियातील (South East Asia) एक महत्त्वाचा प्रवेशद्वारही आहे.

हा प्रदेश बांगलादेश, नेपाळ (Nepal), भूतान (Bhutan) आणि चीनने वेढलेला आहे. तिबेटची (Tibet) चुंबी व्हॅली (Chumbi valley) चिकन नेक कॉरिडॉरपासून फक्त 130 किमी अंतरावर आहे. भारत, नेपाळ आणि भूतानचा त्रिकूट या खोऱ्याच्या टोकाला असून तो डोकलाम प्रदेश (Doklam region) म्हणून ओळखला जातो. जिथे 2017 मध्ये भारत आणि चीन (India-China Tensions) यांच्यातील संघर्ष उफाळला होता. हिमालय पर्वत जसे कांचनजंगा पर्वत दोन प्रमुख नद्यांचे स्त्रोत आहेत, ज्याला तीस्ता आणि जलदाखा म्हणतात. बांगलादेशात प्रवेश केल्यावर हे दोघे ब्रह्मपुत्रा नदीत सामील होतात.

सिलीगुडी कॉरिडॉर का महत्त्वाचा आहे?

भारताच्या ईशान्य भागात पाच कोटी लोकसंख्या आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून, हा कॉरिडॉर ईशान्येकडील राज्यांच्या आणि उर्वरित भारताच्या व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भारत आणि ईशान्येकडील राज्यांमधील एकमेव रेल्वे मालवाहतूक लाइन देखील इथे आहे. दार्जिलिंगचा चहा आणि लाकूड या प्रदेशाचे महत्त्व आणखी वाढवतात. रस्ते आणि रेल्वे सिलीगुडी कॉरिडॉरद्वारे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) जोडलेले आहेत. सर्व आवश्यक गोष्टी त्यांना फक्त या कॉरिडॉरद्वारेच पुरवण्यात येतात. हे भारत आणि त्याच्या ईशान्येकडील राज्ये तसेच दक्षिणपूर्व आशियातील आसियान देशांदरम्यान कनेक्टिव्हिटी सुलभ करुन भारताला 'अॅक्ट ईस्ट पॉलिसीला मदतही करतो.

ईशान्येकडील राज्यांमध्ये बेकायदेशीर स्थलांतर, सीमापार दहशतवाद आणि इस्लामिक अतिरेकी यांच्याशी लढण्यासाठी हा कॉरिडॉर महत्त्वाचा ठरला आहे. आग्नेय आशिया त्याच्या सुवर्ण त्रिकोणासाठी कुख्यात आहे. म्यानमार, थायलंड आणि लाओसमध्ये संघटित गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांची तस्करी प्रचलित आहे. त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या भारतीय राज्यांमध्ये या देशांमधून अंमली पदार्थांच्या तस्करीचा प्रसार हा एक मोठा सुरक्षा धोका आहे. सिलीगुडी कॉरिडॉरमधील सुरक्षा सुधारून हे क्षेत्र सुरक्षित करता येते. तिबेटच्या जवळ असल्याने भारत येथून चीनवर नजर ठेवण्यास सक्षम आहे. युद्धाच्या वेळी शस्त्रे आणि सैनिक सहज तैनात करता येतात.

चीनशी सीमावाद कायम

बीजिंग आपल्या बेल्ट अँड रोड योजनेच्या नावाखाली भारताच्या शेजारील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. त्यामुळे हे देश कर्जाच्या जाळ्यात चांगलेच अडकत चालले आहेत. त्याचवेळी, पूर्व लडाखमध्ये सुरु असलेला सीमा विवाद सोडवण्यासाठी भारतीय आणि चीनी लष्करी कमांडरांमध्ये झालेल्या चर्चेमधून कोणत्याही स्वरुपाचा अद्याप तोडगा निघालेला नाही. सीमेवरील ताण कमी करण्यासाठी दोन्ही सैन्यांमध्ये डझनहून अधिक फेऱ्या झाल्या, परंतु यानंतरही यावर तोडगा निघालेला नाही. फेब्रुवारीमध्ये लष्करी कमांडर स्तरावरील चर्चेनंतर दोन्ही पक्षांनी पँगोंग त्सोच्या आसपासच्या काही भागातून सैन्य मागे घेण्यास सहमती दर्शविली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT