Corona news, WHO warns on corona News, corona News Updates dainik gomantak
ग्लोबल

Corona News : WHO चा कोरोनाबाबत सतर्कतेचा इशारा

Corona News : दक्षिण कोरिया आणि चीनसह काही देशांमध्ये संक्रमणाच्या आकड्यांमध्ये वाढ

दैनिक गोमन्तक

जीनिव्हा : जगात वाढत्या कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येमुळे जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. संघटनेने जगाला विषाणूविरोधात सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. या बरोबरच ही मोठ्या संकटाची सुरुवात असू शकते, अशी शक्यता वर्तवली आहे. दक्षिण कोरिया आणि चीनसह काही देशांमध्ये संक्रमणाच्या आकड्यांमध्ये वाढ सुरु आहे. या व्यतिरिक्त तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की अमेरिकेसह अनेक देशांमधील स्थिती बिघडू शकते. (World Health Organization warns on corona)

जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले, की महिनाभर आकडे कमी झाल्यानंतर गेल्या आठवड्यापासून पुन्हा वाढू लागले आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएंट, बीए.२ सब व्हेरिएंट आणि कोरोना निर्बंधांकडे दुर्लक्ष आदी कारणांमुळे कोरोना वाढतोय. संघटनेचे अध्यक्ष ट्रेडरोस अधानोम घेब्रेयसिस म्हणाले, काही देशांमध्ये कोरोना चाचण्या कमी होत असल्याने ही ते वाढत आहे. याचा अर्थ असा की रुग्णसंख्या वाढत आहे. ही फक्त सुरुवात आहे. डब्ल्यूएचओचे अधिकारी काही देशांमध्ये चुकीच्या माहितीमुळे कमी झालेले कोरोना लसीकरण (Vaccination) हे कोरोना वाढीचे एक कारण मानत आहेत.(WHO warns on corona News)

प्रसारमाध्यमांशी बोलताना संघटनेचे मारिया वेन केरखोव्ह म्हणाले, की बीए.२ आतापर्यंत सर्वांत वेगाने फैलावणारा व्हेरिएंट दिसत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत जगभरात नवीन कोराना (Corona) संक्रमणाची संख्या ८ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. ७ ते १३ मार्चच्या दरम्यान १.१ कोटी नवीन रुग्ण आणि ४३ हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाल्या. जानेवारीनंतर पहिल्यांदा ही वाढ दिसली होती. या दरम्यान डब्ल्यूएचओचे पश्चिम प्रशांत क्षेत्रात संक्रमणाचे आकडा सर्वात जास्त वाढले. यात दक्षिण कोरिया (Korea) आणि चीनचा (China) समावेश आहे. येथे रुग्णसंख्या २५ टक्के आणि मृत्यू २७ टक्क्यांपर्यंत वाढली. आफ्रिकेतही (Africa) नवीन रुग्णसंख्येत १२ टक्क्यांनी वाढ झाली आणि मृत्यू १४ टक्क्यांनी वाढली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT