Action On Taliban by Whatsapp Dainik Gomantak
ग्लोबल

"आता आमचे कसं होणार"? Whats App च्या एका निर्णयामुळे तालिबानची धावपळ

Ashutosh Masgaunde

Taliban Accounts blocked by WhatsApp:

अमेरिकेने अफगाणिस्तान सोडले पण तालिबानशी अमेरिकेचे वैर संपलेले नाही. आता अमेरिकेची बिग टेक कंपनी मेटाने तालिबानवर मोठी कारवाई सुरू केली आहे.

तालिबान सरकारचे कामकाज मेटा-मालकीच्या इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपवर अवलंबून आहे. आणि व्हॉट्सअ‍ॅपने आता तालिबानच्या अकाउंट्सवर बंदी घालण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे तालिबान सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.

तालिबानचे पोलिस प्रवक्ते शीर अहमद बुरहानी म्हणाले, व्हॉट्सअ‍ॅप आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, जर व्हॉट्सअ‍ॅप नसेल तर आमचे सर्व काम कसे होणार याची चिंता आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या जिवावर तालिबानचे सरकार

किंबहुना असं म्हटलं जातं की, निरक्षर तालिबान्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप हे सरकार चालवण्याचं एक चांगलं माध्यम बनलं होतं. याद्वारे ते त्यांचे बोलणे रेकॉर्ड करून ते एकमेकांपर्यंत पोचवत असत. गेल्या काही दिवसांपासून तालिबानी अधिकारी, सुरक्षा दल आणि इतर प्रशासकीय व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बंदी घातली जात आहे.

अहवालानुसार, तालिबान सरकार फक्त व्हॉट्सअ‍ॅपवर चालत होते आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून छोट्या-मोठ्या अधिकाऱ्यांना सूचना देत होते, पण आता अधिकाऱ्यांचे अकाउंट एक-एक करून ब्लॉक केले जात आहेत. त्यामुळे तालिबान सरकारचे कामकाज जवळपास ठप्प झाले आहे.

अफगाणिस्तानात स्मार्ट फोनचा वापर वाढला

विशेष म्हणजे अफगाणिस्तानमध्ये 4G नेटवर्क सुधारले आहे आणि तेव्हापासून येथे स्मार्टफोनचा ट्रेंड वाढला आहे. अशा परिस्थितीत तालिबानच्या प्रशासकीय कामात विशेष म्हणजे अफगाणिस्तानमध्ये 4G नेटवर्क सुधारले आहे. तेव्हापासून येथे स्मार्टफोनचा ट्रेंड वाढला आहे.

अशा परिस्थितीत तालिबानच्या प्रशासकीय कामात व्हॉट्सअ‍ॅपचा वापर वाढला होता. कर्मचाऱ्यांना किंवा सरकारी विभागांनीही सूचना देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर केला जात आहे.

सरकारसाठी व्हॉट्सअ‍ॅप आवश्यक

याशिवाय याचा वापर सरकारकडून पत्रकारांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठीही केला जातो.तालिबानी सैन्य व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आयएसच्या तळांवर हल्ले घडवून आणायचे, मात्र व्हॉट्सअ‍ॅप बंद झाल्यामुळे कोणतीही माहिती तालिबानी सैनिकांपर्यंत पोहोचत नाही.

तालिबानचे पोलिस प्रवक्ते शीर अहमद बुरहानी म्हणाले, व्हॉट्सअ‍ॅप आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, जर व्हॉट्सअ‍ॅप नसेल तर आमचे सर्व काम विस्कळीत होईल.

एका अहवालानुसार, सध्या तालिबानमधील 70 टक्के लोकांकडे स्मार्टफोन आहेत. अशा परिस्थितीत व्हॉट्सअ‍ॅप बंद करणे हा तालिबानसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

अमेरिका नेहमीच तालिबान आणि त्यांच्या कोणत्याही स्वरूपाला गुन्हेगार मानत आली आहे. यामुळे नाव, प्रोफाइल पिक्चर, फोटो आणि मेसेज ओळखल्यानंतर मेटा ग्रुप अकाउंट ब्लॉक करतो. अमेरिकेने तालिबानवर दोन दशकांपूर्वी निर्बंध लादले होते जे अजूनही लागू आहेत. मेटा यांच्या या कारवाईमुळे अनेक तालिबानी कारवाया ठप्प झाल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT