What Is Israel Arrow-3 Used First Time Against Houthi Rebels Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: काय आहे Arrow-3? हौथी बंडखोरांविरुद्ध इस्रायलने पहिल्यांदाच वापरले; व्हिडिओ

What Is Israel Arrow-3 Used First Time Against Houthi Rebels: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरु होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे.

Manish Jadhav

What Is Israel Arrow-3 Used First Time Against Houthi Rebels: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरु होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. या युद्धात लहान मुलांसह हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, इस्रायलने शुक्रवारी दावा केला की, त्यांनी इराण-समर्थित हौथी बंडखोरांविरुद्ध आपले नवीन शस्त्र एरो-3 क्षेपणास्त्र इंटरसेप्टर वापरले आहे. इस्त्रायलने सांगितले की, गुरुवारी संध्याकाळी एरो-3 यशस्वीरित्या ऑपरेट करण्यात आले. त्यामुळे लाल समुद्र परिसरात इस्रायलच्या दिशेने सुरु झालेले हलले प्रभावीपणे रोखण्यात आले.

2017 मध्ये पहिल्यांदा कार्यरत करण्यात आले

इस्रायल डिफेन्स फोर्सेसचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल डॅनियल हगरी यांनी सांगितले की, एरो-3 इंटरसेप्टर प्रक्षेपित करण्यात आले, त्याने लाल समुद्रातून इस्रायलला (Israel) येमेनपासून धोका असलेल्या टार्गेटला यशस्वीरित्या रोखले आणि नष्ट केले. इस्रायलने 2017 मध्ये पहिल्यांदा एरो 3 इंटरसेप्टर हायपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यरत केले होते.

एरो-3 ची क्षमता किती आहे?

दरम्यान, ही एक प्राणघातक लांब पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली आहे जी 100 किमी (62 मैल) पेक्षा जास्त उंचीवर आणि क्षेपणास्त्रांना रोखण्यास सक्षम आहे. एरो 3 हा इस्रायलच्या एरो शस्त्र प्रणालीचा (AWS) भाग असून जी एक स्वतंत्र अँटी-टॅक्टिकल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आहे.

देशाच्या बहु-स्तरीय संरक्षण क्षेपणास्त्रांचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. ज्यामध्ये एरो 2, डेव्हिड स्लिंग आणि आयरन डोम सक्रिय संरक्षण प्रणाली देखील समाविष्ट आहे, जी 2017 मध्ये इस्रायली हवाई दलात समाविष्ट करण्यात आली. हे क्षेपणास्त्र (Missile) अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे विकसित केले आहे.

दुसरीकडे, गुरुवारी संध्याकाळी दक्षिणेकडील पॅट्रियट क्षेपणास्त्र इंटरसेप्टर बॅटरीने इस्रायली प्रदेशात प्रवेश करण्यापूर्वी आणखी एक संशयित टार्गेट रोखल्याचे आयडीएफने सांगितले. युद्धादरम्यान येमेनमधून वारंवार क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांनंतर इस्रायलने लाल समुद्रात आपली हालचाल वाढवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: सोनं, रोकड अन् महागडे गॅजेट्स... पेडण्यात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 53 लाखांच्या मुद्देमालासह दोघे अटकेत

गोवा सरकारकडून भारतरत्न वाजपेयींना अनोखी श्रद्धांजली; नव्याने निर्माण होणाऱ्या जिल्ह्याचे नामकरण केले 'अटल'

पाकिस्तान लष्करप्रमुख आसीम मुनीरनं गुपचूप उरकलं लेकीचं लग्न, पुतण्यालाचं बनवलं जावई; रावळपिंडीत पार पडला शाही सोहळा!

Viral Video: बंदुकीचा धाक दाखवून लुटायला आले, पण 'एका' धाडसी कृत्याने उलटला खेळ, भरचौकात उतरवला माज; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर 'धूम' स्टाईल दरोड्याचा प्रयत्न! गोव्याला जाणाऱ्या 'कुरिअर कंटेनर'चा पाठलाग अन् दगडफेक, 6 जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT