China experiencing a sudden outbreak of HMPV Dainik Gomantak
ग्लोबल

HMPV: चीनमध्ये पुन्हा कोरोनासारखे संकट; काय आहे नवा संसर्ग? लक्षणे, खबरदारी आणि उपाय

What Is HMPV: ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस श्वसन संस्थेवर हल्ला करतो. विशेषत: हिवाळ्यात हा आजार जास्त पसरतो, असे सांगितले जाते.

Pramod Yadav

कोरोना या संसर्गजन्य महामारीने जगभरात कोट्यवधी लोकांचा बळी घेतला. चीनमधील वेट मार्केटमधून बाहेर पडलेल्या या विषाणूने जगाला वेठीस धरले होते. पाच वर्षानंतर चीनमध्ये आता आणखी एका संसर्गाने धुमाकूळ घातला असून, अनेक रुग्णालयात गर्दी झालीय तर स्मशानभूमी फुल्ल व्हायला लागल्यात. नवा संसर्ग दुसरा कोणता नसून ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस (HMPV) असे त्याचे नाव आहे.

विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, चीनमध्ये मायको प्लाझ्मा न्यूमोनी, कोव्हिड - १९ आणि HMPV असे विविध संसर्ग पसरले आहेत. चीनमध्ये इमर्जन्सी जाहीर केल्याचा दावा देखील केला जात आहे. दरम्यान, तशी अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस श्वसन संस्थेवर हल्ला करतो. विशेषत: हिवाळ्यात हा आजार जास्त पसरतो, असे सांगितले जाते.

ह्युमन मेटा न्यूमो व्हायरसची लक्षणे कोणती आहेत? (HMPV Symptoms)

ह्युमन मेटा न्यूमो व्हायरसमध्ये ताप, थंडी ही सामान्य लक्षणे आहेत.

याशिवाय

- खोकला

- ताप

- नाक चोंदणे

- घसा कोरडा पडणे

- श्वास घेण्यास त्रास होणे

संसर्ग शरिरिरात पसरण्यासाठी तीन ते सहा दिवसांचा कालावधी घेतो. तसेच, खोकला, शिंक आणि स्पर्शातून हा संसर्ग पसरतो, अशी माहिती तज्ञांनी दिलीय.

संसर्गाचा जास्त धोका प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांना आहे. यामुळे गंभीर आजार होण्याचा धोका अधिक असतो असे तज्ञ सांगतात.

काय काळजी घ्याल (Prevention)

- किमान २० सेकंद साबणाने हात स्वच्छ करा

- खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक झाका

- सार्वजनिक ठिकाणी वावरताना तोंडाला मास्क घाला

- डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार हात लावू नका

- आजारी असल्यास घरातच आयसोलेट व्हा

उपाय काय? (Cure)

ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस आजारावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नसल्याची माहिती आहे. त्यामुळे खबरदारी हाच उपाय या आजारावर सुचवला जातोय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पणजीत खळबळ! बसस्थानकाजवळ आढळला छत्तीसगडच्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह; परिसरात भीतीचे वातावरण

AUS W vs PAK W: भारतीय वंशाच्या अलाना किंगची कमाल, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रचला नवा इतिहास; मोडला 22 वर्ष जुना रेकॉर्ड

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

मुलाचा घटस्फोट, आईने घातला दुधाने अभिषेक; 'हॅप्पी डिव्होर्स' केक कपणाऱ्या तरुणाचा Video Viral

म्हापसा दरोडा! 30 तास उलटले, हाती धागेदोरे नाहीत; खबर मिळताच तातडीने नाकाबंदी न केल्यानेच दरोडेखोरांचे फावले

SCROLL FOR NEXT