भारतासह जगभरातील मायक्रोसॉफ्ट विंडोजची सेवा विस्कळीत झाली आहे. क्राऊडस्ट्राईकमुळे भारत, ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि अमिरिकेतील लॅपटॉप युझर्सना ब्ल्यु स्क्रिन ऑफ डेथची समस्या निर्माण झाली आहे.
मायक्रोसॉफ्ट विंडोज आपोआप सुरु-बंद होत असल्याने जगभरातील युजर्स हैराण झाले. क्राऊडस्ट्राईकमुळे ही समस्या उद्भवल्याचे डेल कंपनीने म्हटले आहे.
मध्य अमेरिकेत गुरुवारी सायंकाळी ही समस्या निदर्शनास आली. अनेक विमान कंपनीना याचा फटका बसला. यात अमेरिकने एअरलाईन्स, फ्रोन्टिअर, एलिजिएन्ट, सन कंट्री यांचा समावेश आहे. तर, भारतात इंडिगोसह इतर एअरलाईन्स कंपनींना याचा फटका बसला. सुरुवातीला ही समस्या क्राऊडस्ट्राईकमुळे झाल्याचे निदर्शनास आले नाही.
क्राऊडस्ट्राईक काय आहे?
क्राऊडस्ट्राईक युझर आणि उद्योगांना सायबर सुरक्षा पुरवते. सिंगल सेन्सर आणि युनिफाईड थ्रीट इंटरफेसचा यासाठी उपयोग केला जातो. फाल्कन आयडेंटिटी प्रोटेक्शन रिअल टाईम थोक्यापासून सुरक्षा पुरवते.
फाल्कन सेन्सरमध्ये बिघाड झाल्याने ही समस्या निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. क्राऊडस्ट्राईकने ही समस्या लक्षात आल्यानंतर त्यांचे अभियंते सुविधा पूर्ववत करण्यासाठी काम करत असल्याची माहिती दिली आहे.
ब्ल्यु स्क्रिन डेथ म्हणजे काय?
विंडोज ऑपरेटींग सिस्टिममध्ये उद्भवणारी ब्ल्यु स्क्रिन डेथ ही एक मोठी समस्या आहे. विंडोज सुरळीत चालावी यासाठी असणाऱ्या सिस्टिममध्ये बिघाड आल्याने ब्ल्यु स्क्रिन डेथ समस्या निर्माण होते. यामुळे लॅपटॉप किंवा कंप्युटर वारंवार सुरु- बंद होतात. यात सेव्ह न केलेला डेटा कायमचा गमावण्याची भीती असते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.