Israel Hezbollah Conflict Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Hezbollah Conflict: युद्धादरम्यान इस्त्रायलला मोठा झटका; आयर्न डोम नष्ट केल्याचा हिजबुल्लाचा दावा

Israel Hezbollah Conflict: हिजबुल्लाने रामोत नफ्ताली येथील इस्रायलच्या आयर्न डोमला लक्ष्य करुन उध्दवस्त केल्याचे म्हटले आहे.

Manish Jadhav

Israel Hezbollah Conflict: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे. युद्ध सुरु झाल्यापासून इस्त्रायल सातत्याने गाझावर हवाई हल्ले करत आहे. नुकताच इस्त्रायलने राफाह शहरावर हल्ला केला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन इस्त्रायलवर टीकेची झोड उठली. मात्र जोपर्यंत हमासचा पूर्णपणे नाश होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही अशी शपथ बेंजामिन नेतन्याहू यांनी घेतली आहे. याचदरम्यान इस्त्रायलच्या सीमेवर लेबनीज संघटना हिजबुल्लाही दहशतवादी हल्ले करत आहे. हिजबुल्ला सातत्याने इस्त्रायलला निशाणा बनवत आहे.

दुसरीकडे, इस्रायलकडून (Israel) लेबनीज सीमेवर सातत्याने हल्ले केले जात आहेत. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोठा दावा केला आहे. लेबनीज सीमेवर मोठ्या हल्ल्याची तयारी पूर्ण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या भागात इस्रायली सैनिक आणि हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरु आहे. त्याचवेळी, हिजबुल्लाने रामोत नफ्ताली येथील इस्रायलच्या आयर्न डोमला लक्ष्य करुन उद्धवस्त केल्याचे म्हटले आहे.

खरे तर, इस्रायल आणि हमास (Hamas) यांच्यात जवळपास आठ महिन्यांपासून घनघोर युद्ध सुरु आहे. या युद्धात आतापर्यंत लाखो निष्पाप जीव गेले आहेत. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे गाझामध्ये हजारो इमारती जमीनदोस्त झाल्या. त्याचवेळी, हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलींना ओलीस ठेवले आहे. मात्र, काहींना सोडण्यात आले आहे. आता इस्रायलने लेबनॉनमधील काही भागत आणखी गंभीर हल्ल्याची तयारी केली आहे.

नेतन्याहू यांनी लेबनॉन सीमेची पाहणी केली

नेतन्याहू यांनी नुकतीच लेबनॉनच्या सीमावर्ती भागाला भेट दिली, त्यानंतर ते म्हणाले की, 'आम्ही उत्तरेत मोठी कारवाईसाठी तयार आहोत. उत्तरेकडील सीमा आम्हाला सुरक्षित करायची आहे.' इस्त्रायलच्या या वक्तव्यानंतर हिजबुल्लाने सांगितले की, ‘त्यांनी दिवसभरात इस्त्रायली टार्गेटवर अनेक हल्ले केले, ज्यात रामोत नफ्ताली बॅरेक्समधील आयर्न डोम प्लॅटफॉर्मवर क्षेपणास्त्र हल्ला केला.’

इस्त्रायल हिजबुल्लावरील हल्ले वाढवले

गेल्या काही आठवड्यांपासून इस्रायलने हिजबुल्लावरील हल्ले वाढवले आहेत. नेतन्याहू यांचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इटमार बेन ग्वीर आणि अर्थमंत्री बेजेल स्मोट्रिच यांनी अलीकडच्या काळात उत्तर इस्रायलमधील सुरक्षा पुनर्संचयित करण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले होते. गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून झालेल्या हिंसाचारात लेबनॉनमध्ये किमान 455 लोक मारले गेले आहेत, त्यापैकी बहुतेक लढाऊ आहेत, परंतु 88 नागरिक देखील मारले गेले आहेत. त्याचवेळी, या काळात इस्रायलकडून किमान 14 सैनिक आणि 11 नागरिक मारले गेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात धर्मांतरविरोधी कठोर कायदा करा; हिंदू राष्ट्र समन्वय समितीची मागणी

Government Employees: वृद्ध पालकांच्या देखभालीसाठी सरकारी कर्मचारी घेऊ शकतात 30 दिवसांची रजा, केंद्रीय मंत्र्यांनी राज्यसभेत स्पष्टच सांगितलं

Viral Video: नवा जुगाड, नवा व्हिडिओ! सोशल मीडियावर धुमाकूळ, तुम्हीही म्हणाल, 'क्या बात है!'

'म्हादई आमची लढाई, आमचे आम्हाला मिळत नाही तोवर विश्रांती नाही'; प्रमोद सावंत यांच्या वक्तव्यानंतर DK शिवकुमारांचा इशारा

August 2025 Horoscope: मेष ते मीन... ऑगस्टमध्ये 'या' 5 राशींच्या कुंडलीत अशुभ योग, खर्च आणि तणावात वाढ!

SCROLL FOR NEXT