आपल्याला आपला आवडता पदार्थ कुणी खाऊ दिला नाही तर ? सहाजिकच कोणालाही याचा राग येऊ शकतो. परंतु हा तुमच्यावर रागवणारा आणि हट्ट करणारा जरा जास्तच गोड असेल तर ? सध्या सोशल मिडियावर आपल्याला आवडत्या पदार्थासाठी असाच रुसून फुगून बसलेल्या एका लहानग्या मुलाचा व्हिडिओ सोशल मिडियावर (Social Media) सध्या चांगलाच धुमाकुळ घालत आहे. बर्गर (Burger) दिला नाही म्हणून एकदम अस्वस्थ झालेल्या या मुलाची प्रतिक्रिया पाहून नेटकऱ्यांनी अनेक गमतीदार आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
यात नेमकं असं काय घडलं ? सध्या समाजमाध्यमांवर सध्या तूफान व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये फिक निळ्या रंगाचा कुर्ता-पायजमा घातलेला एक लहानगा चिडून सांगत आहे की, तुम्ही माझ्याशी बोलूच नका.. मी उपाशी राहीन ठीके ?'' दरम्यान, या व्हिडिओमध्ये सुरु असलेल्या संभाषणामधून स्पष्ट दिसत आहे की, बर्गर मिळविण्यासाठी खूप कासावीस झाला आहे. कारण त्याच्या बहिणीने फक्त बर्ग फक्त तिच्यासाठीच ऑर्डर केला आहे आणि त्याच्यासाठी मागितलाच नाही. दरम्यान बर्गर खाण्यासाठी इतका राग चांगला नाही, असं म्हणत ट्विटर वापरकर्ता मोहम्मद फ्यूचरवाला यांनी हा व्हिडिओ शेअभारतात प्रवास करणाऱ्यावर प्रवाशांवर 'हा' देश घालणार तीन वर्षाची बंदी केला आहे.
लहानग्याचा बर्गर हट्ट
या व्हिडिओमध्ये लहानग्याची बहिण मात्र आपल्या भावाची गंमत करत त्याला चिडवत असताना पहायाला मिळत आहे. तर तिच्या अशा वागण्यामुळे अस्वस्थ झालेला तो तिच्या अशा वागण्यामुळे या लहान मुलगा म्हणतो की, तू तूझा बर्गर तात्काळ खाऊन घे. मी काही तो खाणार नाही, त्यावर पुढे त्याला चिडवताना गंमतीने त्याची बहिण म्हणते, तुला बर्गर ऑर्डर करायचा असेल तर तू बाबांकडे पैसे मागायला हवे होते. तुझ्याकडे पैसे नाहीत आणि तू म्हणतो, की मला बर्गर हवा, हे बरोबर नाही त्यावर तर हा मुलगा जरा जास्तच संतापलेला दिसून आला.
मी उपाशीचं बसेन
त्याची बहिण सारखीचं चिडवू लागली की, माझ्याकडे पैसे होते म्हणून मी माझ्यासाठी ऑनलाईन ऑर्डर केली. परंतु तुझ्याकडे ऑर्डसाठी पैसे नाहीत. तर असं कसं चालेल. त्यावर आणखी चिडून आणि संतापून तो लहानगा म्हणाला की, तू माझ्यासाठी ऑर्डरच करुच नकोस. मला काहीही खायचं नाही. ठीके ? मी उपाशीचं राहीन. आणि असं म्हणून चक्क तो फूगून तिथन लांब निघून जाताना दिसत आहे. त्यावर त्याची ही गोडी प्रतिक्रिया पाहून त्याला चिडवणारी त्याची बहिण जोराजोरात हसू लागली. दरम्यान, या लहान मुलाच्या व्हिडिओनंतर सोशल मिडियावर देखील प्रतिक्रियांचा पाऊस पडताना पहायला मिळाला.
इस्त्रायली मोसादचे एजंट जाळ्यात अडकवले; इराणचा मोठा दावात्यावर प्रतिक्रिया देत नेटकऱ्याने म्हटले की, तुम्ही या लहान बाळाच्या धमकीला फार हलक्यामध्ये घेऊ नका, तर कोणी म्हणाले की, बर्गर आयुष्य आहे, सगळ्यांनी मिळून त्याला बर्गर आणून द्या रे, इतकच नाही तर काही जणांनी आपल्या लहानपणाच्या आठवणींना उजाळा दिला. त्यामुळे या लहान मुलाचा बर्गरसाठीचा हा गोड हट्ट समाज माध्यमावर चर्चेचा विषय ठरत आहे. काय मग तुम्हालाही हा व्हिडिओ पाहून तुमच्या लहानपणाची आठवण आली का ?
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.