Donald Trump Dainik Gomantak
ग्लोबल

'माझ्या वडिलांचे निधन झाले...', Donald Trump यांच्या मुलाचे ट्वीट; वाचा नेमंक प्रकरण

Donald Trump News: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र आणि उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांचे सोशल मीडिया अकाउंट 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) हॅक झाल्याची बातमी आहे.

Manish Jadhav

Donald Trump News: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र आणि उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांचे सोशल मीडिया अकाउंट 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) हॅक झाल्याची बातमी आहे. हॅक झालेल्या अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

त्यांचे वडील डोनाल्ड ट्रम्प यांचे निधन झाल्याचा दावा करण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे निधन झाले असून ते म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर 2024 मध्ये अध्यक्षपदासाठी लढत असल्याचा दावाही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

डोनाल्ड ज्युनियर यांच्या अधिकृत 'X' अकाउंटवरुन शेअर केलेल्या ट्वीटमध्ये असे लिहिले आहे की, ' माझे वडिल डोनाल्ड ट्रम्प यांचे निधन झाल्याची घोषणा करताना मला दुःख होत आहे.'

मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या अकाउंटवरुन सतत आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणारी माहिती पोस्ट केली जात आहे. वडील डोनाल्ड ट्रम्प यांच्या निधनाच्या बातमीशिवाय अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्याबद्दलही अनेक पोस्ट करण्यात आल्या आहेत. मात्र, हे अकाउंट हॅक झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप आलेली नाही. मात्र तरीही या सर्व बातम्या खोट्या असल्याचे मानले जात आहे.

ट्विटरमध्ये सातत्याने बदल होत आहेत

ट्विटर आता एक्स झाले आहे. मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरला एलन मस्क (Elon Musk) यांनी गेल्या वर्षी 44 अब्ज डॉलर्सच्या डीलमध्ये विकत घेतले होते. तेव्हापासून ते त्यात सातत्याने बदल करत आहेत.

अलीकडेच इस्रायलच्या पंतप्रधानांशी झालेल्या चर्चेत एलन मस्क म्हणाले होते की, लवकरच ते मासिक आधारावर 'X' साठी शुल्क आकारतील. यावर विचार केला जात आहे.

दरम्यान, या करारानंतर मस्क यांनी X संबंधी अनेक बदल केले आहेत. त्यांनी आता ब्लू टिक व्हेरिफिकेशनला सशुल्क सेवेत रुपांतरित केले आहे. यासोबतच मस्क यांनी ट्विटरवरुन या प्लॅटफॉर्मचे नाव बदलून X केले.

तथापि, तरीही तुम्हाला या प्लॅटफॉर्मची जुनी Twitter URL दिसेल. यातही हळूहळू बदल होत आहेत. मस्क यांना हे प्लॅटफॉर्म सुपर अॅपमध्ये बदलायचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'22 मिनिटांचा तो थरार' विसरु नका, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा पाकड्यांना थेट इशारा; 'ऑपरेशन सिंदूर' अजून संपलेलं नाही!

UPI Transactions Record March 2026: डिजीटल इंडियाचा नवा विक्रम! UPI व्यवहारांनी गाठला ऐतिहासिक टप्पा; मार्च महिन्यात 22.64 अब्ज ट्रान्झॅक्शनची नोंद

ना विराट, ना सचिन; युवीच ठरला हिरो! अर्जुन तेंडुलकरनं बॅटिंग आयडॉलवरुन चकवलं, युवराजच्या 'फियरलेस' शैलीचा दिवाना

एव्हरेस्टवर गिर्यारोहकांच्या जिवाशी खेळ! 167 कोटींच्या विमा घोटाळ्याचा पर्दाफाश, पर्यटकांच्या अन्नात कालवलं विष; 32 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Grah Gochar 2026: द्विद्वादश आणि अष्टादश योगाचा धमाका! शुक्र, वरुण आणि बुधाची युती; 'या' 5 राशींच्या लोकांना धनलाभाची 'सुवर्णसंधी'

SCROLL FOR NEXT