चीनने(China) देशात अतिवृष्टीचा(Heavy Rain) इशारा दिल्यानंतर राजधानी बीजिंगमधील(Beijing) सर्व पर्यटनस्थळे बंद करण्यात अली आहेत . सुरक्षेसाठी आणीबाणी लागू करण्यात आली असून ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार, रविवारपासून चीनमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस 60 ते 100 मि.मी.इतका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ( Warning of heavy rains in China)
चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने सांगितले आहे की बीजिंगमध्ये रविवारी दुपारपासून २०२१ या वर्षातील सर्वात जास्त मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून तो कमीत कमी 30 तासांपर्यंत सुरूच राहील. बीजिंग मेट्रोऑलॉजिकल सर्व्हिसने वादळासाठी पिवळ्या रंगाचा अलर्ट जारी केलाअसून ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार, बीजिंग ड्रेनेज ग्रुपने पंप स्टेशन व जल प्रकल्पांमध्ये २९०० हून अधिक कर्मचारी नियुक्त केले आहेत.
राजधानीच्या पश्चिम आणि उत्तर भागात सर्वाधिक पाऊस पडणार असून या पावसाचा परिणाम 100 ते 150 मिमीपर्यंत होईल. पूर्वानुमानानुसार काही ठिकाणी पाऊस 200 ते 300 मिमीपर्यंत वाढेल.
त्याचवेळी चीनच्या सिचुआन प्रांतात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. अधिक पावसासह वादळाचा इशारा स्थानिक प्रशासनानेही दिला आहे. शुक्रवारपासून सिचुवान प्रांतात मुसळधार पाऊस पडत असून सर्व 14 नद्यांच्या पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे. येथे अनेक पूल वाहून गेले आहेत. पाच हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून एक लाख वीस हजाराहून अधिक लोक बाधित आहेत.बझोंग आणि सिचुआनमधील हजारो लोकांना विजेविना जगणे भाग पडत आहे . चीनच्या हवामान खात्याने येथे पावसासह वादळांचा इशारा दिला आहे. अनेक ठिकाणी रेल्वे आणि हवाई सेवाही बंद झाल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.