Volcano erupts in Indonesia Dainik Gomantak
ग्लोबल

इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, 13 जणांचा मृत्यू

या स्फोटात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून डझनभर जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

इंडोनेशियन (Indonesia) जावा बेटावरील सेमेरू ज्वालामुखीमध्ये (Volcano) अडकलेल्या दहा जणांची सुटका करण्यात आली आहे. देशाच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेने (BNPB) रविवारी ही माहिती दिली. या स्फोटात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून डझनभर जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या ज्वालामुखीतून राख आणि धूर निघत होता. ज्वालामुखीतून निघणाऱ्या राखेचा आणि धुळीचा थर इतका जाड आहे की संपूर्ण जावा बेट दिवसा रात्रीच भासत होते. या क्षेत्रात काम करणाऱ्या विमान कंपन्यांनीही वैमानिकांना सूचना दिल्या आहेत.

ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर लगेचच पूर्व जावा प्रांताची आपत्ती व्यवस्थापन संस्था सक्रिय झाली. स्फोटामुळे विस्थापित झालेल्यांसाठी राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना सरकारने जारी केल्या होत्या. ते म्हणाले की, पूर्व जावा प्रांतातील दोन जिल्हे या घटनेमुळे खूपच प्रभावित झाले आहेत. या जिल्ह्यांवर विशेष लक्ष दिले जात आहे. स्फोटामुळे बाहेर पडलेल्या धुराच्या दाट लोटामुळे लोकांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही लोक अशा भागात अडकले होते जिथे बचावकर्त्यांना पोहोचणे कठीण होते.

ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे आकाशातून राख, माती आणि दगडांचा पाऊस पडला. त्यामुळे प्रोनोजिव्हो आणि कांडीपुरो या दोन मुख्य गावांना जोडणारा पूल तुटला. AirNav इंडोनेशिया या इंडोनेशियाच्या हवाई क्षेत्रावर नियंत्रण ठेवणाऱ्या एजन्सीने विमान कंपन्यांना आकाशात राख आणि धूळ पसरण्याबाबत चेतावणी दिली आहे.सेमेरू हा जावा बेटावरील सर्वात उंच पर्वत आहे. हे इंडोनेशियाच्या 130 सक्रिय ज्वालामुखींपैकी एक आहे आणि सर्वात दाट लोकवस्ती असलेल्या प्रांतांपैकी एक आहे. या वर्षातील हा दुसरा स्फोट आहे. शेवटची घटना जानेवारीमध्ये घडली आणि त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Army Jawan Assaulted: देशरक्षकच असुरक्षित? लष्कराच्या जवानाला टोल नाक्यावर खांबाला बांधून मारहाण, 6 जण अटकेत

Heavy Rain in Goa: राज्याला मुसळधार पावसाचा तडाखा; 100 इंचापेक्षा जास्त पावसाची नोंद

Pune-Sindhudurg Flight: पुण्यातील कोकणवासियांना बाप्पा पावला... गणेश चतुर्थीनिमित्त 'Fly91'च्या उड्डाण संख्येत वाढ, वाचा सविस्तर

Memu Special Train: कोकणातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, 'या' मार्गावर धावणार अनारक्षित मेमू स्पेशल ट्रेन

कारच्या धडकेत एका मुलीसह आठ जण जिवंत जाळले; गुजरातमधील घटना

SCROLL FOR NEXT