Vladimir Putin  Dainik Gomantak
ग्लोबल

Vladimir Putin: पुतिन पुन्हा अध्यक्षपदाच्या शर्यतीत, 2030 पर्यंत सत्तेत राहण्याची तयारी; तीन दशकांचा होणार कार्यकाळ

Russian President Vladimir Putin: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे गेली 25 वर्षे सत्तेत आहेत आणि नजीकच्या भविष्यात पद सोडण्याचा त्यांचा विचार नाही.

Manish Jadhav

Russian President Vladimir Putin: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे गेली 25 वर्षे सत्तेत आहेत आणि नजीकच्या भविष्यात पद सोडण्याचा त्यांचा विचार नाही. रशियामध्ये 2024 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार असून त्यात व्लादिमीर पुतिन पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत. ते देशातील सर्वात शक्तिशाली राजकीय नेते आहेत.

अशा स्थितीत त्यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड होणार हे निश्चित मानले जात आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली तर ते 2023 पर्यंत सत्तेत राहतील.

ते 1999 पासून सत्तेवर आहेत आणि त्यांनी याआधीच प्रदीर्घ कार्यकाळ सत्तेत राहण्याचा विक्रम केला आहे. 1999 मध्ये बोरिस येल्तसिन यांच्याकडून त्यांना वारशाने सत्ता मिळाली आणि तेव्हापासून ते सत्तेत आहेत.

दरम्यान, गेली अडीच दशके सत्तेत राहिलेल्या जगातील मोजक्या राज्यकर्त्यांपैकी व्लादिमीर पुतीन हे एक आहेत. गेल्या वर्षी युक्रेनवर (Ukraine) झालेल्या हल्ल्यानंतर त्यांची भूमिका महत्त्वाची बनली आहे. जोसेफ स्टॅलिननंतर ते सर्वात जास्त काळ सत्ता गाजवणारे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत, यावरुन त्यांच्या उंचीचा अंदाज लावता येतो.

रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन 7 ऑक्टोबर रोजी 71 वर्षांचे झाले आहेत. अलीकडेच, रशियामध्येही एक सर्व्हे समोर आला आहे, ज्यामध्ये 80 टक्के लोकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. आता व्लादिमीर पुतिन यांचा पक्ष लवकरच निवडणूक प्रचारात उतरणार आहे.

दुसरीकडे, हा निर्णय घेण्यात आला असून व्लादिमीर पुतिन निवडणूक लढवणार असल्याचे त्यांच्या पक्षातील सूत्रांनी सांगितले. व्लादिमीर पुतिन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी सध्या अजेंडा आणि प्रचाराची रणनीती तयार केली जात आहे.

एका सूत्राने सांगितले की, जगातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता व्लादिमीर पुतिन हे रशियासाठी पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचे झाले आहेत. पुतिन यांच्या उमेदवारीबाबत लवकरच औपचारिक घोषणा केली जाईल, असे ते म्हणाले.

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले की, जर व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी कोणीही उरणार नाही.

याशिवाय, व्लादिमीर पुतिन आजारी असल्याच्या वृत्ताचेही क्रेमलिनने खंडन केले आहे. पेस्कोव्ह म्हणाले की, पाश्चिमात्य माध्यमेच अशा बातम्या पसरवत असतात. यात तथ्य नाही. गोर्बाचेव्हच्या काळात गुप्तचर अधिकारी असलेले व्लादिमीर पुतिन हे कठोर प्रशासक मानले जातात.

याशिवाय, ते सोव्हिएत युनियनचे विघटन ही एक ऐतिहासिक चूक म्हणून पाहत आहेत. म्हणूनच तो युनायटेड रशियाबद्दल बोलत आहे, ज्यामध्ये ते रशियापासून वेगळे झालेल्या देशांना एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT