Vladimir Putin Dainik Gomantak
ग्लोबल

World War III चा धोका लक्षात घेता पुतीन यांचा मेगा प्लॅन, अणुबॉम्बही...

World War III Countdown: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाला 8 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे.

दैनिक गोमन्तक

World War III Countdown: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाला 8 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. तिसर्‍या महायुद्धाचा धोका जगाला सतावत आहे. दरम्यान, तिसऱ्या महायुद्धाचा धोका लक्षात घेऊन रशियाने आपल्या देशात तयारी सुरु केल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानुसार रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये 900 बॉम्ब शेल्टर तयार केले जात आहेत. यातील काही कामे यापूर्वीच पूर्ण झाली आहेत. दुसरीकडे, दावा केला जात आहे की, यापैकी एक बॉम्ब शेल्टर रेडिएशन प्रूफ आहे, ज्यावर अणुबॉम्बचा देखील प्रभाव पडत नाही.

जगावर तिसऱ्या महायुद्धाचा धोका निर्माण झाला

डेली स्टारमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, तज्ञांनी दावा केला की, युक्रेनसोबत (Ukraine) सुरु असलेल्या युद्धामुळे रशिया त्रस्त झाला आहे. दीर्घकाळ चाललेल्या युद्धामुळे त्याचे खूप नुकसान झाले आहे. युद्ध संपवण्यासाठी रशिया अणुबॉम्बचा वापर करु शकतो, ज्यामुळे तिसरे महायुद्ध सुरु होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

सर्व सुविधांनी सुसज्ज

रशियाच्या (Russia) बॉम्ब शेल्टरमध्ये राहण्याची आणि अन्न साठवण्याची तसेच पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था असल्याचे सांगण्यात येत आहे. रशियाच्या राजधानीत वेगाने 900 बॉम्ब शेल्टर तयार करण्याचे काम सुरु आहे. मॉस्को शहरातील अनेक भागात बॉम्ब शेल्टर बांधले जात आहेत. एकट्या खामोव्हनिकीच्या पॉश भागात सुमारे 30 बॉम्ब शेल्टर बांधल्याचा दावा करण्यात आला आहे.

रशिया मोठी तयारी करत आहे

रशियाची राजधानी मॉस्को (Moscow) येथे बांधण्यात येत असलेले हे बॉम्ब शेल्टर सर्व सुविधांनी सज्ज असतील. यामध्ये अत्यावश्यक गोष्टी उपलब्ध असतील. तिसरे महायुद्ध झाले तर या बॉम्ब शेल्टरमध्ये मोठ्या संख्येने लोक आश्रय घेऊ शकतील.

विशेष म्हणजे, रशिया आणि युक्रेनमध्ये अनेक दिवसांपासून युद्ध सुरु आहे. पुतीन यांनी युक्रेनचे चार प्रांत आपल्या देशात विलीन केले आहेत, तर युक्रेननेही रशियाकडून आपली बरीच जमीन परत घेण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, या युद्धाचा आतापर्यंत कोणताही परिणाम झालेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Department of Animal Husbandry: पशुसंवर्धन खाते प्रमुखांविना ठप्प, कामधेनू सुधारित योजनेसह अनेक योजना प्रभावित

Goa Today's News Live: बांबोळीत पुन्हा अपघात, दुभाजकाला धडकली बस

Horoscope: आजचा दिवस 'गोल्डन'! गुरुवारी 'या' 3 राशींच्या नशिबाचे दरवाजे उघडणार, परिश्रमाचे उत्तम फळ मिळणार

Night Vigil App: तंत्रज्ञानामुळे रात्रीची सुरक्षा होणार अधिक सक्षम, विद्यार्थ्यांनी बनवलेले 'नाईट व्हिजिल' ॲप पोलिसांसाठी नवे हत्‍यार

Jasprit Bumrah Record: 'शतक' नाही, 'त्रिशतक'! जसप्रीत बुमराह बनणार क्रिकेटचा 'ऑल-फॉरमॅट किंग', फक्त 2 विकेट्सची गरज

SCROLL FOR NEXT