Russia-North Korea: उत्तर कोरियाचे राष्ट्रप्रमुख किम जोंग उन हे नेहमीच आपल्या वक्तव्य आणि कृतींमुळे चर्चेत असतात. आता ते रशियाचे पंतप्रधान वाल्मिदिर पुतिन यांना भेटणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
रशिया आणि उत्तर कोरिया हे दोन देश इतर देशांवरच्या आक्रमणासाठी ओळखले जातात. आता या दोन देशांचे एकत्र येणे इतर देशांसाठी काळजीचे कारण बनले आहे.
पुतिन आणि किम जोंग उन यांची याआधी भेट कधी झाली होती?
2019 मध्ये पूर्व रशियातील व्लादिवोस्तोक या शहरात पुतिन यांनी पहिल्यांदा किम जोंग यांची भेट घेतली होती. दोन्ही देशांचे एकत्र येणे इतर देशांसाठी धोकादायक असल्याचे मत इतर देशांनी त्यावेळी व्यक्त केली आहे कारण रशिया आणि उत्तर कोरिया हे दोन्ही देश आधुनिक अण्वस्रांनी परिपूर्ण आहेत.
आता कुठे होणार बैठक?
यावेळी बैठक कुठे होणार याची माहीती अधिकृतरित्या जाहीर झाली नसली तरीही रशियन न्यूज एजन्सी 'तास' दिलेल्या माहीतीनुसार, 2019 मध्ये ज्या ठिकाणी बैठक पार पडली होती त्याच ठिकाणी म्हणजेच पूर्व रशियातील व्लादिवोस्तोक या शहरात ही बैठक पार पडू शकते.
महत्वाचे म्हणजे, गेल्या आठवड्यात यूएस अधिकाऱ्यांनी गुप्त माहिती दिली होती की, उत्तर कोरिया आणि रशिया बैठक आयोजित करत आहेत. ही बैठक या महिन्यात होऊ शकते.
रशिया आणि उत्तर कोरियाने यावर काय म्हटले?
पुतिन आणि किम जोंग उन यांच्या भेटीच्या वृत्ताला दोन्ही देशांनी दुजोरा दिला आहे. याबद्दल रशियाच्या राष्ट्रपति कार्यालय ‘क्रेमलिन’ या वेबसाइटवर थोडक्यात माहीती दिली आहे. राष्ट्रपति व्लादिमीर पुतिन यांनी दिलेल्या निमंत्रणानुसार किम जोंग उन हे रशियाच्या दौऱ्यावर असणार आहेत. उत्तर कोरियाची सरकारी एजन्सी केसीएनएने याला दुजोरा दिला आहे.
असोसिएटेड प्रेसच्या पत्रकारांना उत्तर कोरिया-रशिया सीमेजवळील एका स्टेशनवर पिवळ्या पट्ट्ये असलेली हिरवी ट्रेन दिसली, जी किम जोंग उनच्या मागील परदेश दौऱ्यांदरम्यान वापरलेली ट्रेनसारखीच होती. मात्र, किम या ट्रेनमध्ये होते की नाही हे स्पष्ट झालेले नाही. ही ट्रेन बुलेटप्रुफ असल्याचे म्हटले जाते.
दरम्यान, नुकतीच G-20 परिषदेत रशिया(Russia )-युक्रेन युद्धाबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. महत्वाची बाब म्हणजे, या जाहीरनाम्यावर सहभागी सर्व देशांनी सहमती दर्शवली आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यानी रशियाचा उल्लेख न करता युक्रेनच्या प्रश्नावर मार्ग काढल्याने भारताचे आभार मानले आहेत. रशिया-युक्रेनचे युद्ध दीड वर्षाहून अधिक काळ चालले आहे. याचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. आर्थिकदृष्ट्या संपूर्ण जगाला या युद्धाचे परिणाम भोगावे लागत आहेत.
आता रशियाने उत्तर कोरियाबरोबर भेट का आयोजित केली आहे? भेटीमागील नेमका हेतू काय ? कोणते करार केले जातील का? रशिया-युक्रेन युद्धाबाबत काय चर्चा होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.