Viral CT Scan Video Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Video: देसी 'सीटी स्कॅन' मशीनचा भन्नाट जुगाड व्हायरल, डॉक्टर आणि रुग्ण बनून तरुणाईची कमाल; नेटकरी म्हणाले...

Viral CT Scan Video: सीटी स्कॅन मशीनच्या डमीचा व्हिडिओ (Dummy CT Scan Video) सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Manish Jadhav

Viral CT Scan Video: सीटी स्कॅन (CT Scan) मशीन ही एक मोठी डोनेटच्या आकाराची रचना असते, ज्यामध्ये मध्यभागी एक गोल छिद्र असते. यावर एक टेबल असतो, ज्यावर रुग्ण झोपतो आणि त्यानंतर हा टेबल हळूहळू स्कॅनरच्या आत फिरतो. मशीनमध्ये एक्स-रे ट्यूब्स आणि डिटेक्टर्स असतात, जे शरीराभोवती फिरुन वेगवेगळ्या कोनातून इमेजेस (Images) कॅप्चर करतात.

मात्र या सगळ्या वैज्ञानिक बाबींपेक्षा वेगळी सध्या सोशल मीडियावर (Social Media) धुरंधरांनी अशी एक 'देसी' सीटी स्कॅन मशीन तयार केली, जी पाहिल्यानंतर खरे डॉक्टरही विचारात पडतील. या सीटी स्कॅन मशीनच्या डमीचा व्हिडिओ (Dummy CT Scan Video) सोशल मीडियावर सध्या तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण आणि तरुणी डॉक्टर आणि रुग्णाची नक्कल करताना दिसत आहेत. त्यांनी सीटी स्कॅन करण्याची जी अनोखी पद्धत दाखवली, ज्यामुळे हा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.

एक्स (X) वर व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, हा मजेशीर व्हिडिओ एक्स (X) वर @DashrathDhange4 नावाच्या हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, "ही सीटी स्कॅन मशीन पाहून जगभरातील डॉक्टर सदम्यात आहेत. तुम्हाला येथे सीटी स्कॅन करायला आवडेल का?"

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुणाने एका ड्रमला (Drum) आडवे ठेवले आहे आणि स्ट्रेचरऐवजी लाकडी फळीचा (Wooden Plank) वापर केला आहे. त्याच फळीवर तरुणी रुग्ण बनून आपला सीटी स्कॅन करण्यासाठी येऊन झोपते. त्यानंतर स्ट्रेचर म्हणजेच लाकडी फळी हळूच ड्रमच्या दिशेने सरकते आणि सीटी स्कॅनची प्रक्रिया पूर्ण होते.

सीटी स्कॅन झाल्यानंतर तरुणाने ड्रमच्या वर ठेवलेल्या मशीनच्या बोर्डच्या मागून सीटी स्कॅनचा 'रिपोर्ट' काढला आणि तो तरुणीच्या हातात दिला. ही संपूर्ण प्रक्रिया आणि वापरलेले 'तंत्रज्ञान' पाहून यूजर्स हसून लोटपोट झाले आहेत.

यूजर्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ (Video) पाहिल्यानंतर यूजर्संनी खूप मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत:

  • एका युजरने लिहिले की, "हे तर आताचे नवीन तंत्रज्ञान (New Technology) आहे."

  • दुसऱ्या युजरने गमतीने लिहिले, "यांच्यावर केस करा, ते भारताच्या जुगाडची कॉपी करत आहेत."

  • तिसऱ्या युजरने 'या' तंत्रज्ञानाचे कौतुक केले: "ही खूपच कमाल सीटी स्कॅन मशीन आहे. ही टेक्नॉलॉजी देशाबाहेर जाता कामा नये."

  • तर चौथ्या युजरने रिपोर्टबद्दल विनोद केला, "रिपोर्टमध्ये खूप काही निघाले आहे, ते आम्ही आता सांगणार नाही; त्यासाठी अजून काही तपासणी करावी लागेल."

हा व्हिडिओ भारतीय 'देसी जुगाड'ची आणि विनोदी प्रवृत्तीची झलक दाखवतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Crime: एक महिन्यापासून देता होता त्रास, दुचाकीवरुन पाठलाग करुन विद्यार्थिनीवर केला ॲसिड हल्ला; ओळखीतल्या तरुणासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Ajinkya Rahane: "टीम इंडियाला माझी गरज..." 159 धावांच्या धडाकेबाज खेळीनंतर अजिंक्य रहाणेने निवडकर्त्यांवर साधला निशाणा!

Abbakka Devi History: पोर्तुगिजांनी युद्धाच्या आधी सैन्याचे तंबू पेटवून दिले, 'राणी अब्बक्का'ने अग्निबाण वापरला; अज्ञात इतिहास

Double Hat-Trick: अविश्वसनीय! एकाच डावात दोन गोलंदाजांनी घेतली हॅट्रिक, डबल हॅट्रिक घेणारे 'ते' दोन गोलंदाज कोण? Watch Video

Horoscope: उत्तम आरोग्याचे संकेत! 'या' 3 राशींच्या लाईफस्टाईलमध्ये होणार लक्षणीय सुधारणा, जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य

SCROLL FOR NEXT