व्हिएतनाममध्ये (Vietnam) कोरोनाचा प्रसार केल्याबद्दल एका व्यक्तिला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याने विलगीकरणाचे नियम (Covid-19 Rules) मोडले असून इतर नागरिकांपर्यंत कोरोनाचा प्रसार केल्याबद्दल ही कठोर शिक्षा सुनावण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारी माध्यमांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. व्हिएतनाम वृत्तसंस्थेच्या मतानुसार, 28 वर्षीय ले वॅन त्राईला (Le Van Trai) दक्षिणेकडील प्रांतातील न्यायालयाने सोमवारी झालेल्या एक दिवसीय सुनावणीत "धोकादायक संसर्गजन्य रोग पसरवल्याबद्दल" दोषी ठरवण्यात आले.
व्हिएतनाम जगातील अशा देशांपैकी एक आहे, ज्याने कोरोना संसर्गावर यशस्वी नियंत्रण मिळवले आहे. देशात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णांना ट्रेस करत त्यांन विलगीकरण कक्षात ठेवणे, जलद संपर्क ट्रेसिंग, कडक सीमा निर्बंध आणि कठोर क्वारंटाईन नियम (How Vietnam Control Coronavirus) आहेत. परंतु एप्रिलच्या अखेरीपासून कोरोनाचे नव नवे व्हेरिएंट जगाबरोबर व्हिएतनामला हादरवून सोडत आहे. एजन्सीने दोषी व्यक्तीबद्दल सांगितले, 'वान ट्री हो ची मिन्ह (Ho Chi Minh) मार्गे सा मऊ शहराकडे गेला होता ... आणि त्याने 21 दिवसांच्या विलगीकरणाचे नियम मोडले होत
आठ लोकांना संसर्ग झाला
दोषी व्यक्तीबद्दल पुढे असे सांगितले जाते की, 'त्रीने आठ लोकांना संक्रमित केले, त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान एक महिन्यानंतर मृत्यू झाला.' ज्या शहरामध्ये हे सगळं घडलं त्या शहरात कोरोनामुळे 191 नवे रुग्ण आढळून आले होते, त्यापैकी दोन व्यक्तिंचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. (Jail Punishment Vietnam). देशात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या हो ची मिन्ह शहरात सुमारे 260,000 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 10,685 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशातील परिस्थिती झपाट्याने खालावत आहे.
शिक्षा आधीच दिली गेली
व्हिएतनाममध्ये आतापर्यंत कोरोना 536,000 रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 13,385 लोकांचा मृत्यू झाला आहे. हेच कारण आहे की सरकार नियम मोडणाऱ्यांविरोधात कठोरपणा दाखवत आहे. त्यासाठी सरकार लष्कराचीही मदत घेत आहे. यापूर्वी दोन वेगवेगळ्या लोकांना शिक्षा झाली आहे. यापूर्वी दोन्ही 18 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.