British PM meets Ukraine PM Dainik Gomantak
ग्लोबल

British PM meets Ukraine PM: ऐन युद्धात झेलेन्स्की यांचे तोंड गोड! PM सुनक यांनी दिली आईने बनवलेली खास मिठाई Video

Volodymyr Zelenskyy: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते त्यांच्या आईने बनवलेली बर्फी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना शेअर करताना दिसत आहेत.

Manish Jadhav

British PM meets Ukraine PM: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते त्यांच्या आईने बनवलेली बर्फी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना शेअर करताना दिसत आहेत.

खुद्द सुनक यांनीच त्यांच्या इंस्टाग्रामवर (Instagram) हा व्हिडिओ शेअर केला आहे. यासाठी त्यांनी एक छान कॅप्शन देखील दिले आहे. हा व्हिडिओ मे महिन्यातील असला तरी सुनक यांनी 18 जून रोजी शेअर केला.

वास्तविक, अलीकडेच ऋषी सुनक एका मुलाखतीदरम्यान झेलेन्स्की यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा संदर्भ देत होते. सोबतच आईने बनवलेली बर्फी झेलेन्स्की यांना खाऊ घालण्याबाबतही ते बोलले. आईने माझ्यासाठी गोड भारतीय बर्फी बनवली होती, असे सुनक यांनी सांगितले.

बर्फी बनवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना भेटलो. चर्चा सुरु झाल्यावर त्यांनी भूक लागल्याचे सांगितले. त्यानंतर मी त्यांना आईने बनवलेली बर्फी खाऊ घातली.

दुसरीकडे, सुनक यांनी व्हिडिओ शेअर करताना एक छान कॅप्शनही दिले आहे. त्यांनी लिहिले आहे की, युक्रेनचे (Ukraine) राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की त्यांच्या आईने बनवलेली मिठाई दररोज खातात असे नाही. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सुनक युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना बर्फी देताना दिसत आहेत.

सुनक यांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स काय म्हणाले?

ऋषी सुनक यांनी शेअर केलेल्या या मजेदार व्हिडिओवर अनेक यूजर्संच्या प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत. एका युजर्सने लिहिले आहे की, देशाचा पंतप्रधान होण्यासोबतच एक चांगला माणूस असणे देखील आवश्यक आहे.

त्याचवेळी, आणखी एका यूजर्सने सांगितले की, हे खूप मजेदार आहे. आपण सर्वजण आपल्या आईंनी बनवलेल्या बर्फीशी त्याचा संबंध जोडू शकतो. तिसरा यूजर्स म्हणाला की, बर्फीसोबत ऋषी सुनक यांच्या काही आठवणी ताज्या झाल्या.

झेलेन्स्की 15 मे रोजी सुनक यांना भेटण्यासाठी ब्रिटनला गेले होते

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध अद्याप थांबलेले नाही. गेल्या 16 महिन्यांपासून दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरु आहे. युक्रेनला या लढ्यात ब्रिटनसह अनेक युरोपीय देशांचा पाठिंबा मिळाला आहे. युद्धादरम्यान, या वर्षी 15 मे रोजी, झेलेन्स्की यांनी सुनक यांना भेटण्यासाठी ब्रिटनला भेट दिली. जिथे दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये लष्करी आणि आर्थिक मदतीबाबत चर्चा झाली. या चर्चेदरम्यानच सुनक यांनी आईने बनवलेली बर्फी झेलेन्स्की यांना खाऊ घातली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

SCROLL FOR NEXT