Japan Tsunami Dainik Gomantak
ग्लोबल

Japan Tsunami Video: होक्काइडो ते टोकियो खाडीपर्यंत... जपानमध्ये त्सुनामीने पुन्हा उडवला हाहाकार; फुकुशिमा न्यूक्लिअर प्लांट केला बंद

Japan Tsunami: जपान वेदर एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, 60 सेंटीमीटर (सुमारे 2 फूट) उंचीची त्सुनामीची पहिली लाट होक्काइडोच्या (Hokkaido) पूर्व किनाऱ्यावरील नेमुरो (Nemuro) येथे पोहोचली.

Manish Jadhav

Japan Tsunami Video: रशियाच्या कामचटका द्वीपकल्पात (Kamchatka Peninsula) बुधवारी (30 जुलै) सकाळी 8.8 तीव्रतेचा विनाशकारी भूकंप झाला. या भूकंपापाठोपाठ प्रशांत महासागरात त्सुनामीच्या लाटा उसळल्या. या त्सुनामीचा फटका रशिया, अमेरिका, न्यूझीलंड आणि जपान यांसारख्या देशांच्या किनारी भागांना बसला. यामध्येही जपानला सर्वाधिक फटका बसला.

जपानमध्ये त्सुनामीचा कहर

जपान वेदर एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, 60 सेंटीमीटर (सुमारे 2 फूट) उंचीची त्सुनामीची पहिली लाट होक्काइडोच्या (Hokkaido) पूर्व किनाऱ्यावरील नेमुरो (Nemuro) येथे पोहोचली. या लाटा प्रशांत किनाऱ्यावरुन होक्काइडोपासून टोकियोच्या खाडीपर्यंत दक्षिणेकडे सातत्याने वाढत आहेत. त्सुनामीच्या धोक्यामुळे जपानमध्ये सुमारे 20 लाख लोकांना आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले आहे. होक्काइडोमधून आलेल्या छायाचित्रांमध्ये लोक घरांच्या छतांवर जमा होऊन मदतीसाठी विनवणी करताना दिसत आहेत. जपानी अधिकाऱ्यांनी लोकांना उत्तरेकडील किनारी भाग खाली करुन उंच ठिकाणी जाण्यास सांगितले.

अणुऊर्जा प्रकल्पापर्यंत पोहोचल्या लाटा

जपानच्या प्रशांत किनाऱ्यावर त्सुनामीच्या लाटा धडकल्या. प्रशांत किनाऱ्याव्यतिरिक्त, उत्तरेकडील होक्काइडोपासून दक्षिणेकडील वाकायामा प्रांतापर्यंत (Wakayama Province) जपानी अधिकाऱ्यांनी लोकांना घरे रिकामी करण्याचे आवाहन केले. जपान वेदर एजन्सीने सांगितले की, त्सुनामीच्या लाटा 3 मीटरपर्यंत उंच असू शकतात, ज्यामुळे निवासी भागात मोठी हानी होण्याची शक्यता आहे.

सर्वात चिंतेची बाब म्हणजे, जपानच्या फुकुशिमा न्यूक्लिअर प्लांटपर्यंत (Fukushima Nuclear Plant) त्सुनामीच्या लाटांनी धडक दिली आहे. त्सुनामीचा धोका लक्षात घेऊन प्लांटमधील कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सध्या प्लांटमध्ये कोणत्याही नुकसानीची माहिती नाही. मात्र, 2021 मध्ये जपानमध्ये 9.0 तीव्रतेच्या भूकंपानंतर आलेल्या त्सुनामीमुळे फुकुशिमा दाइची प्लांटमध्ये (Fukushima Daiichi Plant) मोठा अपघात घडला होता, त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे.

जपानमध्ये जीवितहानी नाही

त्सुनामीच्या संकटावर बोलताना जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा (Shigeru Ishiba) यांनी सांगितले की, अधिकारी परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. मदत आणि बचाव पथकेही (Relief and Rescue Teams) सतर्क आहेत. जपानच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, कोणत्याही मदत आणि बचाव कार्यात मानवी जीव वाचवणे ही पहिली प्राथमिकता असेल.

इशिबा यांनी नागरिकांना किनारपट्टीपासून दूर राहण्यास आणि उंच ठिकाणी जाण्यास सांगितले आहे. जपानमध्ये त्सुनामीमुळे आतापर्यंत कोणत्याही जीवितहानीची (Loss of Life) किंवा मालमत्तेच्या नुकसानीची (Property Damage) पुष्टी झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'तो' देवदूत बनून आला! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वासराला पाठीवर बसवून वाचवला जीव; पूरग्रस्त जम्मूतील हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल

Mental Health And Heart Disease: नैराश्य आणि ताणतणाव वाढवतात हृदयविकाराचा धोका; मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणं ठरु शकतं जीवघेणं

मानसिक रुग्णांना मिळणार 'नवी उमेद'; IPHB मध्ये लवकरच सुरू होणार पुनर्वसन केंद्र

Gold Price Hike: शेअर बाजार पडला, पण सोन्याने घेतली उसळी, एका महिन्यात तब्बल 'इतक्या' हजारांची वाढ; आता सप्टेंबरमध्ये होणार नवा रेकॉर्ड?

Duleep Trophy 2025: 13 चौकार, 3 षटकार! आयुष बडोनीचा 'डबल धमाका'; द्विशतक ठोकून टीमला पोहोचवले उपांत्य फेरीत

SCROLL FOR NEXT