V K Singh dainikgomantak
ग्लोबल

V K Singh ON POK: 'थोडं थांबा, पीओके आपोआप भारतात सामील होणार...;' केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंग यांचे वक्तव्य

V.K. Singh ON POK: या घटनेनंतर युनायटेड नेशन्स आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटना या प्रदेशाला पाकव्याप्त काश्मीर या नावाने ओखळतात.

दैनिक गोमन्तक

V. K. Singh ON POK: भारत आणि पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच पाकव्याप्त काश्मिर हा दोन्ही देशातील वादाचा मुद्दा राहिलेला आहे. आजही या भागावरुन दोन्ही देशात कटूता निर्माण होताना दिसते. आता माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय मंत्री वीके सिंह यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान पून्हा एकदा यावर भाष्य केले आहे.

काय म्हणाले व्ही. के. सिंह?

फक्त काही काळ वाट पाहा, पीओकेचा भाग आपोआपच भारतात सामील होईल असे म्हटले आहे. पीओके भारतात सामील व्हावा अशी लोकांची इच्छा आहे, यावर बोलताना त्यांनी असे उत्तर दिले आहे.

इतिहास काय सांगतो?

पाकव्याप्त काश्मीर अर्थात पीओके हा विवादित प्रदेश आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, हा भाग त्यांच्या अधिकाराखाली येणाऱ्या भागात येतो. तर भारताच्या म्हणण्यानुसार, पीओके भारताचा भाग असून पाकिस्तान अवैधरित्या आणि जबरदस्तीने यावर आपला अधिकार सांगत आहे.

जेव्हा भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र झाले तेव्हा जम्मू आणि काश्मीरला पाकिस्तान किंवा भारतात कोणत्याही देशात सामील होण्याची संधी होती. तेव्हा जम्मू काश्मीरचे राजा हरि सिंग यांनी दोन्ही देशात सामील न होता स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला.

१९४७ ला पाकिस्तानच्या पश्तून समूहाने काश्मीरच्या या प्रदेशावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. पाकव्याप्त काश्मिर जम्मू आणि काश्मीरचा भाग असून १९४७ पासून पाकिस्तानने त्यावर अधिकार सांगायला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर युनायटेड नेशन्स आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटना या प्रदेशाला पाकव्याप्त काश्मीर या नावाने ओखळतात.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसाठी हा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे दोन्ही देश पाकव्याप्त काश्मीरवर आपला अधिकार सांगतात. या भागात दहशतवादी कारवायांचे प्रमाणदेखील जास्त असल्याने या मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत असतो.

व्ही. के. सिंह यांचे म्हणणे काय?

राजस्थानमध्ये एका पत्रकार परिषदेदरम्यान, व्ही के सिंग यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. राजस्थानची जनता कॉंग्रेसच्या गैरकारभारामुळे त्रासली आहे. कायद्यांचे पालन केले जात नाही, युवा आणि शेतकऱ्यांना दिलेली आश्वासन सत्ताधाऱ्यांकडून पूर्ण केली जात नाहीत. त्यामुळे भाजपला जनतेमध्ये जाऊन त्यांचे म्हणणे ऐकूण घेण्यासाठी परिवर्तन संकल्प यात्रा काढणे भाग पडले आहे. या यात्रेत जनता भाजपला साथ देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पीओके हा संवेदनशील मुद्दा असून केंद्रीय मंत्री व्ही के सिंग यांच्या अशा वक्तव्याचा नेमका अर्थ काय असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. याबरोबरच, आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे काय पडसाद उमटणार हे पाहणेदेखील महत्वाचे ठरणार आहे. महत्वाचे म्हणजे, पाकिस्तान यावर आपली काय भूमिका मांडणार, भारत- पाकिस्तान मधील तणाव वाढणार का हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhaje Ghar: 'माझे घर'चे अर्ज सोमवारपासून उपलब्ध; योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा, CM प्रमोद सावंतांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Goa Teacher Recruitment: 'टीईटी'अभावी शिक्षक उमेदवारांची जाणार संधी, परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे 'प्रमाणपत्र' सादर करणे अनिवार्य

Illegal Spa Goa: मसाज पार्लरच्‍या नावाखाली कोलव्यात वेश्‍‍याव्‍यवसाय, दोन पार्लरवर छापे; 9 युवतींची सुटका

Mapusa Theft: म्हापशातील सशस्त्र दरोडा; दोन दिवस उलटले, अद्याप धागेदोरे नाहीत; पोलिसांची आठ पथके मागावर

PM Narendra Modi: काँग्रेसनेच लष्कराला हल्ल्यापासून रोखले, '26-11'बाबत पंतप्रधान मोदींची टीका

SCROLL FOR NEXT