Viral Video Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Video: रशियन महिलेचं 'हिंदी'वरचं प्रभुत्व पाहून यूजर्सच्या उंचावल्या भुवया... व्हायरल व्हिडीओनंतर कौतुकाचा वर्षाव

Manish Jadhav

Viral Video: नुकताच आपण हिंदी दिवस साजरा केला. या खास प्रसंगी जगभरातून विविध प्रकारचे व्हिडिओ समोर आले आहेत. यापैकी एक खास व्हिडिओ रशियामधून आला आहे.

X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये एक रशियन महिला तिच्या हिंदी समजूतीने सर्वांना प्रभावित करत आहे. हा व्हिडिओ भारतीय रेल्वे सेवेत तैनात असलेले जे संजय कुमार यांनी पोस्ट केला आहे.

व्हिडिओमध्ये ते हिंदीत काहीतरी बोलत आहेत. यानंतर रशियन महिला त्याचे इंग्रजीत भाषांतर करते. संजय यांनी व्हिडीओसोबत लिहिले आहे की, त्यांचे भाषांतर करणे सोडा, मी काय बोललो ते अनेकांना समजणारही नाही.

यानंतर संजय यांनी रशियन महिलेच्या हिंदी आकलनाचे कौतुक केले. सोशल मीडियावर (Social Media) या पोस्टवर लोक खूप लाईक आणि कमेंट करत आहेत. आशुतोष नावाच्या युजरने लिहिले आहे की, अशी शुद्ध हिंदी केवळ ऐकायलाच नाही तर ती बोलतानाही छान वाटते.

हिंदीच्या अचूक शब्दसंग्रहाबद्दल तुमचे आभार आणि आमच्या रशियन मैत्रिणीचे खूप खूप अभिनंदन. खरोखरच त्यांची हिंदीची समज आणि पकड आश्चर्यकारक आणि प्रेरणादायी आहे. त्याचवेळी, इतर लोकांनी देखील त्यांचे वेगवेगळ्या प्रकारे कौतुक केले आहे.

दरम्यान, भारत दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा करतो. 1949 मध्ये हिंदीला भारताची अधिकारीक भाषा म्हणून घोषित करण्यात आले.

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.

भारतात (India) उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये हिंदी बोलली जाते. याशिवाय, मॉरिशस, नेपाळ, फिजी, सुरीनाम, गयाना, त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्येही हिंदी बोलली आणि समजली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: ख्रिस्ती समाजाच्या मोर्चाचा वाहतुकीला फटका; अनेकांची गैरसोय

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

SCROLL FOR NEXT