USA Dainik Gomantak
ग्लोबल

USA: आठ वर्षांच्या बहिणीचे अपहरण करायला आला टपोरी, भावाने गलोल ओढली अन्... वाचा धाडसी घटना

धाडसी भावाने गलोलने हल्लेखोरांच्या छातीवर आणि तोंडावर मारा केला.

Pramod Yadav

USA: अमेरीकेतील मिशिगन शहरातून एक धाडसी घटना समोर आली आहे. आठ वर्षीय बहिणीचे अपहरण करण्यासाठी आलेल्या एका टपोरी मुलाला 13 वर्षीय भावाने अद्दल शिकवली आहे. एवढेच नव्हे तर त्यांने गलोलचा वापर करत त्यांच्यावर हल्ला केला आणि बहिणीची सुटका केली. बुधवारी ही घटना घडली.

असोसिएटेड प्रेस (AP) ने दिलेल्या वृत्तानुसार, मिशिगन येथील अल्पेना शहरात 17 वर्षाय एक टपोरी मुलगा आठ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यासाठी आला मुलीला पकडून त्याने मुलीचे तोंड दाबत तिला घट्ट पकडले. दरम्यान, हा सगळा प्रकार मुलीच्या भावाने पाहता त्याने गलोलचा वापर करत हल्लेखोरावर मारा केला. यात हल्लेखोर जखमी झाला.

या धाडसी भावाने सुरूवातीला हल्लेखोरांच्या छातीवर आणि तोंडावर मारा केला. यामुळे हल्लेखोराने मुलीला सोडले व तिची त्याच्या तावडातून सुटका झाली.

दरम्यान, पोलिसांनी 17 वर्षीय हल्लेखोर मुलाला अटक केली असून, त्याच्या विरोधात अपहरण, हल्ला करून इजा पोहोचवणे यासारख्या कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी मुलाचे नाव गुप्त ठेवले आहे.

हल्लेखोर मुलगा शेजारीच राहत असल्याची देखील माहिती समोर आली असून, या घटनेत त्याच्या शरिरावर काही जखमा देखील झाल्या आहेत. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Smriti Mandhana: लग्न मोडलं... स्मृती मानधनाने पोस्ट करत लग्नाबाबत स्पष्टचं सांगितलं, पाहा पोस्ट

Shivaji Maharaj Cavalry: राज्याभिषेकानंतर आई जिजाऊसाहेबांनी शिवरायांना आग्रहाने कृष्णा घोड्यावर बसवले होते; छत्रपतींचे समृद्ध घोडदळ

Goa Nightclub Fire: डान्स सुरू असतानाच भडकल्या ज्वाळा; हडफडे क्लबमधील दुर्घटनेचा थरार दर्शवणारा 'तो' Video Viral!

Goa Live News: हडफडे आग दुर्घटनेतील पीडितांची मंत्र्यांनी घेतली भेट; रोहन खंवटे यांची कठोर कारवाईची मागणी

Konkani Word Etymology: ‘बाप’ हा शब्द सध्याच्या कुंळबी भाषेतील ‘आब’ या ‘वडील’ अर्थाच्या शब्दाचे रूप; कोकणी शब्दांचे कुरुंब मूळ

SCROLL FOR NEXT