McDonald’s USA Dainik Gomantak
ग्लोबल

McDonald’s Chicken Nugget: एका चुकीचे किंमत 80 लाख; अमेरिकेतील न्यायालयाचा मॅकडोनाल्डला झटका

Olivia Caraballo: टॅमरॅक येथील मॅकडोनाल्डच्या बाहेर ही घटना घडली. मॅकडोनाल्ड आणि तिची फ्रँचायझी अपचर्च फूड्स यांच्यावर मुलीच्या पालकांनी खटला दाखल केला होता.

Ashutosh Masgaunde

McDonald’s USA: दक्षिण फ्लोरिडा ज्युरीने मॅकडोनाल्डला एका पीडित कुटुंबाला 80 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

सुमारे चार वर्षांपूर्वी मॅकडोनाल्डचे चिकन नगेट्स ऑलिव्हिया कॅराबॅलो (Olivia Caraballo) नावाच्या 4 वर्षांच्या मुलीवर पडले, ज्यामुळे ती गंभीरपणे भाजली होती.

2019 चे प्रकरण

2019 मध्ये ही घटना घडली तेव्हा ऑलिव्हिया काराबॅलो फक्त 4 वर्षांची होती. फोर्ट लॉडरडेलजवळील टॅमरॅक येथील मॅकडोनाल्डच्या बाहेर ही घटना घडली.

मुलीचे पालक, फिलाना होम्स आणि हंबरटो काराबॅलो एस्तेवेझ यांनी मॅकडोनाल्ड आणि तिची फ्रँचायझी अपचर्च फूड्सवर दावा दाखल केला होता.

मुलीला 'हॅपी मील' देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यात गरम चिकन नगेट्स देखील होते, जे मुलीच्या अंगावर पडले आणि तिला गंभीर भाजले.

दीड कोटी रुपये नुकसान भरपाईची मागणी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मुलीचे कुटुंब दीड कोटी रुपये नुकसान भरपाईची मागणी करत होते. बुधवारी सर्व बाबी तपासल्यानंतर ज्युरीने हा निर्णय दिला.

मुलीला झालेला त्रास लक्षात घेता, 80 लाख रुपये देण्याचे आदेश देण्यात आले.

न्यायालयाच्या निर्णयाने कुटुंब आनंदी

ऑलिव्हियाची आई फिलाना होम्स म्हणाली, "मला आनंद झाला की ज्युरीने आमचा आवाज ऐकला आणि योग्य निर्णय दिला." या प्रकरणात मला कोणतीही अपेक्षा नव्हती, त्यामुळे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे, असे ती म्हणाली.

पुनरावृत्ती

याच फास्ट फूड कंपनी विरुद्ध 1990 च्या दशकातील कुप्रसिद्ध हॉट कॉफी खटल्याची (Hot Coffee Lawsuit ) आठवण करून देणारे हे प्रकरण आहे.

त्या प्रकरणात, न्यू मेक्सिकोच्या ज्युरीने 81 वर्षांच्या स्टेला लीबेक यांना तब्बल 27 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. यामध्ये स्टेला लीबेक यांच्या मांडीवर मॅकडोनाल्डची कॉफी सांडली होती. ज्यामुळे त्यांचे पाय आणि मांडीचा सांधा गंभीरपणे भाजला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kabul Bus Accident: काबूलमध्ये भीषण अपघात, प्रवासी बस उलटून 25 जणांचा मृत्यू; 27 जखमी

Love Horoscope: जोडीदाराला थोडा वेळ द्या! अनुभवा 'मोठे' बदल; वाचा प्रेम राशीफळ

Michael Clarke Cancer: विश्वचषक जिंकवून देणाऱ्या स्टार क्रिकेटपटूला कर्करोग, पोस्ट करत दिली माहिती

तवडकरांना मिळाली गावडेंकडे असलेली सर्व खाती, 'आदिवासी कल्याण'ही पाहणार; कामतांकडे PWD, आणखी 2 मंत्र्यांना मिळाली 2 खाती

Bicholim: डिचोलीत झाली 4 टन फुलांची विक्री, भाव वाढल्याने विक्रेते आनंदी; चतुर्थीच्या पूर्वदिनी 'अच्छे दिन'

SCROLL FOR NEXT