The US will distribute 2 crore vaccine doses to needy countries in June 
ग्लोबल

Coronavirus in India: कोरोनाशी लढा देण्यास अमेरिका भारताला मदत करत राहणार

गोमंन्तक वृत्तसेवा

वॉशिंग्टन: भारतात सध्या सुरू असलेल्या कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus in India)  साथीच्या पार्श्वभूमीवर जगभरातून मदत मिळत आहे. ऑक्सिजन केंद्रासह सर्व आवश्यक वैद्यकीय उपकरणे देखील अमेरिकेतून (America)नवी दिल्ली येथे पाठविली गेली आहेत. त्याचबरोबर अमेरिकेने म्हटले आहे की ते भारताला (US Medical assistance)  मदत करत राहतील जेणेकरुन ते कोरोनाविरूद्ध लढ्यात भारताला मदत देऊ शकतील. त्याचबरोबर व्हाईट हाऊसने(White House) म्हटले आहे की, अमेरिका भारताला सर्व प्रकारची मदत देत राहील, जेणेकरून त्याचा महत्त्वाचा भागीदार देश कोविड -19 साथीच्या रोगावर मात देवू शकेल.(The US will distribute 2 crore vaccine doses to needy countries in June)

व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी जेन साकी(Jen Psaki) यांनी आपल्या दैनंदिन पत्रकार परिषदेत सांगितले की, 'कोविड मदतीसाठी 100 कोटी डॉलरची घोषणा करणारे अध्यक्ष जो बायडन मदत कार्यक्रमात सहभागी आहेत. जगाच्या वेगवेगळ्या प्रदेशांवर त्याचा कसा परिणाम होत आहे, हे राष्ट्रपतींना सांगितले जात आहे. आमच्या या महत्त्वपूर्ण भागीदारातही भारताचा समावेश आहे. राष्ट्रपती मदत देण्याच्या कार्यात सखोल सहभाग घेतात. आम्ही भारताला आणखी कोणत्या प्रकारची मदत देऊ शकतो याचा विचार करत आहोत."

भारताला कशा प्रकारे मदत करता येईल ?

भारताच्या कोरोना परिस्थितीबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना साकी यांनी आपले मत व्यक्त केले. "या कठीण काळात अमेरिका आपल्या महत्त्वपूर्ण भागीदार देशाला  कशी मदत देऊ शकते यावर काम करत आहे, आम्ही  सुमारे 10 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स ची मदत देण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही अमेरिकन एजन्सी फॉर इंटरनॅशनल  डेव्हलपमेन्टकडून अर्थसहाय्यित सात हवाई जहाज पाठविले आहेत. आणि ऑक्सीजन कंसंट्रेटरचे आज सातवे विमान भारतात पोहचणार आहे. कोविडशी संघर्ष करणाऱ्या रुग्णांसाठी ऑक्सीजन कंसंट्रेटर ची आवश्यक असणार आहे. आम्ही त्यांना पाठिंबा देत राहू. त्यांच्या संपर्कातही राहू,"असे साकी सांगतिले. 

अमेरीका आणखी दोन करोड लसींचे डोस देणार

दुसरीकडे, जो बायडन यांनी काल सोमवारी कोवि़ड-19 लसीचे आणखी 2 दशलक्ष डोस पुढील सहा आठवड्यांत अमेरिका जगाला वाटतील, असे सांगितले. यापुर्वी बायडन प्रशासनाने जूनअखेरीस  एस्ट्रेजेनेका वैक्सीनचे 60 दशलक्ष डोस सामायिक करण्याचे आश्वासन दिले होते. बायडन प्रशासन जगातील अशा देशांना मदत करणार आहे जिथे कोरोनाव्हायरसमुळे परिस्थिती वाईट आहे आणि जिथे सरकार लस विकत घेऊ शकत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT