Donald Trump Dainik Gomantak
ग्लोबल

America Iran Conflict: अमेरिकेची इराणला खुली धमकी! अणुऊर्जा तळावर होणार मोठा हल्ला; ट्रम्प यांचा लष्कराची तैनाती वाढवण्याचा निर्णय VIDEO

Donald Trump Warning Iran Nuclear Facility Attack: जुलै आणि सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या जोरदार हल्ल्यांनंतर आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अत्यंत कठोर शब्दांत थेट इशारा दिला आहे.

Manish Jadhav

Donald Trump Warning Iran Nuclear Facility Attack: इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष अत्यंत धोकादायक व भीषण वळणावर पोहोचला आहे. जुलै आणि सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या जोरदार हल्ल्यांनंतर आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अत्यंत कठोर शब्दांत थेट इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी 'पिकॅक्स माउंटन' या इराणच्या गुप्त व सुरक्षित मानल्या जाणाऱ्या अणुऊर्जा केंद्राचा विशेष उल्लेख करत, लवकरच अमेरिकी सैन्य इराणच्या या अणुप्रकल्पांवर हल्ला करेल असे स्पष्ट केले. यापूर्वी कधीही लक्ष्य न केलेल्या या ठिकाणावर आता अमेरिकी लष्कराचा मुख्य रोख असणार आहे.

पिकॅक्स माउंटन हे नतांन्झ युरेनियम संवर्धन केंद्राजवळच असलेले एक अत्यंत मजबूत व सुरक्षित ठिकाण असून ते इराणचे 'न्यूक्लियर बंकर' मानले जाते. या पर्वताखाली जमिनीच्या आत दोन बोगदे तयार करण्यात आले असून, तिथे इराणचा संवर्धित युरेनियमचा मोठा साठा आणि अणुबॉम्ब बनवण्यासाठी आवश्यक असलेली सामग्री दडवून ठेवण्यात आली आहे. आजपर्यंत अमेरिका किंवा इस्रायलने या ठिकाणावर प्रत्यक्ष हल्ला केला नव्हता, परंतु आता अमेरिकेची नजर या अत्यंत संवेदनशील अणुप्रकल्पावर खिळली आहे.

विश्लेषकांच्या मते, जर अमेरिकेने (America) या बंकरवर हल्ला केला तर तो केवळ हवाई हल्ला न राहता एका भीषण पूर्णवेळ युद्धाची नांदी ठरेल. ट्रम्प यांनीदेखील हे स्पष्ट केले की, आतापर्यंत झालेले छोटे-मोठे हल्ले म्हणजे 'युद्ध' नव्हते; खरी लढाई इराणच्या या अणुप्रकल्पांवर बॉम्बहल्ले झाल्यावरच सुरु होईल.

या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने मध्य पूर्वेतील आपल्या लष्कराची तैनाती 9 महिन्यांवरुन वाढवून थेट 12 महिने म्हणजेच 2027 पर्यंत करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. अध्यक्षांच्या या थेट आदेशानंतर संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी अमेरिकी सैन्याला आवश्यक निर्देश दिले आहेत. याअंतर्गत सुमारे 50,000 सैनिक, 19 युद्धनौका आणि अत्याधुनिक लढाऊ विमाने 2027 पर्यंत मध्य पूर्वेत तैनात राहणार आहेत.

इराणला कोणत्याही परिस्थितीत अणुबॉम्ब बनवू न देणे हे अमेरिकेचे मुख्य उद्दिष्ट आहे; कारण इराणकडे अण्वस्त्रे आल्यास इतर मुस्लिम राष्ट्रे एकत्र येऊन अमेरिकेच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण करु शकतात, असे ट्रम्प प्रशासनाचे मत आहे. त्यामुळे येत्या काळात अमेरिका आणि इराणमधील हा महासंघर्ष अधिकच चिघळण्याची चिन्हे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT