Hormuz Closure  Dainik Gomantak
ग्लोबल

Petrol-Diesel Price: जगावर इंधनाचे संकट! इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा; भारतात तेलाच्या किमतींचा उडणार भडका?

Hormuz Closure India Fuel Impact: अमेरिकेच्या या हल्ल्यांनंतर आता इराणच्या संसदेने धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्यास मान्यता दिली.

Manish Jadhav

Hormuz Closure India Fuel Impact: इस्त्रायल आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्हीही देश मागे हटायला तयार नाहीत. दोघेही अधिक आक्रमकरित्या एकमेकांवर हल्ले करत आहेत. यातच आता, इस्त्रायलला पाठिंबा देणाऱ्या महासत्ता अमेरिकेचीही या संघर्षात एन्ट्री झाली.

अमेरिकेने इराणमधील तीन अणुस्थळांवर धोकादायक हल्ले केले. अमेरिकेच्या या हल्ल्यांनंतर आता इराणच्या संसदेने धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यास मान्यता दिली, असे इराणच्या सरकारी माध्यमांनी रविवारी (22 जून) वृत्त दिले. इराणच्या संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्य मेजर जनरल कोवसारी म्हणाले की, इराणच्या सर्वोच्च सुरक्षा प्राधिकरणाने आणि सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने या निर्णयाला आता अंतिम मान्यता देणे बाकी आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी

जर इराणने (Iran) होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली तर जागतिक व्यापारात व्यत्यय येईल, तेलाच्या किमती वाढतील आणि जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता निर्माण होईल. जागतिक तेलाच्या वापराच्या 20 टक्के भाग होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जातो, त्यामुळे इराणच्या एका निर्णयामुळे मध्य पूर्वेत आणखी अस्थिरता निर्माण होऊ शकते. मागील 20 महिन्यांपासून हा तणाव वाढत आहे. इस्रायलचे गाझामधील हमास आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाहशी युद्ध, इराणशी संघर्ष आणि सीरियातील राजकीय अस्थिरतेमुळे हा प्रदेश आधीच अशांततेच्या काळातून जात आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी इतकी महत्त्वाची का?

होर्मुझची सामुद्रधुनी ही एक अरुंद पण महत्त्वाचा जलमार्ग आहे, जो पर्शियन आखाताला ओमानच्या आखात आणि अरबी समुद्राशी जोडतो. ही सामुद्रधुनी उत्तरेकडील किनाऱ्यावरील इराण आणि दक्षिणेकडील मुसंदम द्वीपकल्प यांच्यामध्ये आहे, जी ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीचा भाग आहे. हा जलमार्ग अंदाजे 167 किमी लांब आहे, जो त्याच्या सर्वात अरुंद बिंदूवर सुमारे 33 किमी पर्यंत अरुंद आहे. इथे तीन किमी रुंद शिपिंग लेन आहेत, ज्या इनबाउंड आणि आउटबाउंड सागरी वाहतुकीसाठी उपलब्ध आहेत.

होर्मुझची सामुद्रधुनी पर्शियन आखातातून कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या तेल टँकरसाठी एकमेव सागरी मार्ग म्हणून काम करते, ज्यामुळे तो जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी जगातील सर्वात महत्त्वाचा कच्च्या तेलाच्या आयातीचा कॉरिडॉर बनतो. दररोज सुमारे 17 दशलक्ष बॅरल तेलाची वाहतूक होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते. पर्शियन आखातातून होणाऱ्या सर्व तेल निर्यातीपैकी सुमारे 88 टक्के तेल निर्यात या अरुंद जलमार्गातून होते, कारण पर्यायी पाइपलाइन आणि मार्ग मर्यादित आहेत. तेलाव्यतिरिक्त जगातील पेट्रोलियम गॅस (एलपीजी) पैकी सुमारे एक तृतीयांश देखील या कॉरिडॉरमधून जातो.

होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यास भारतावर काय परिणाम होणार?

भारत (India) रशिया आणि काही अरब देशांसह इतर अनेक स्रोतांमधून तेल आणि ऊर्जेच्या गरजा पूर्ण करत असला तरी त्याच्या पुरवठ्याचा मोठा भाग इराणमधूनही येतो. तज्ञांच्या मते, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने भारतीय पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे तेलाच्या किमती वाढतील, ज्यामुळे वस्तूंच्या किमतीवरही परिणाम होईल. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी इस्रायल-इराण संघर्षादरम्यान तेलाच्या किमती वाढल्याबद्दल चिंता कमी केली. ते म्हणाले की, भारताने प्रतिकूल परिस्थितीसाठी तयारी केली असून ऊर्जा दर नियंत्रणात आहेत.

ब्लूमबर्ग न्यूजच्या मते, इराण स्वतः तेल निर्यातीसाठी वाहतुकीवर अवलंबून आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पूर्वेकडील टोकाला असलेल्या जास्क येथे त्याचे एक्सपोर्ट टर्मिनल आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनी बंद केल्यास चीनलाही फटका बसेल, कारण तो इराणी तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आणि एक प्रमुख भागीदार आहे. अमेरिकेच्या निर्बंधाविरोधात चीन इराणचे संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आपल्या व्हेटो पॉवरचा वापर करु शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: पर्यटक महिलेची बेफिकिरी नडली, दारूच्या नशेत गाडी ठोकून 'ती' फरार; स्कुटरस्वार गंभीर जखमी

Viral Video: 'एक्सप्रेस'वे वर थरार! नव्या कारच्या सेलिब्रेशनचा जीवघेणा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, तुम्ही पाहिलाय का?

Navi Mumbai Airport: नवी मुंबईला मिळाली जागतिक ओळख, नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन; पाहा खास Photos Videos

लेट नाईट ऑपरेशन! कोलवा येथे मसाज पार्लरमधून नऊ मुलींची सुटका; पोलिस, अर्ज यांची संयुक्त कारवाई

GDS Recruitment: 'कोकणी भाषा येते?' गोंयकारांसाठी उघडलंय रोजगाराचं दार, पोस्टात काम करण्याची संधी; वाचा माहिती

SCROLL FOR NEXT