Assembly Dainik Gomantak
ग्लोबल

America: जॉर्जियाने 'हिंदूफोबिया' विरोधात ठराव केला मंजूर, हिंदू धर्म हा जगातील...

Resolution Against Hinduphobia: अमेरिकेच्या जॉर्जिया विधानसभेने 'हिंदूफोबिया' ची निंदा करणारा ठराव मंजूर केला आहे.

Manish Jadhav

Resolution Against Hinduphobia: अमेरिकेच्या जॉर्जिया असेम्ब्लीने 'हिंदूफोबिया' ची निंदा करणारा ठराव मंजूर केला आहे. असा कायदेशीर ठराव मंजूर करणारे जॉर्जिया हे अमेरिकेतील पहिले राज्य ठरले आहे.

हिंदूफोबिया आणि हिंदूविरोधी कट्टरतेचा निषेध करत ठरावात म्हटले आहे की, हिंदू धर्म हा जगातील सर्वात मोठा आणि जुना धर्म आहे. जगातील 100 हून अधिक देशांमध्ये 1.2 अब्ज लोक या धर्मावर विश्वास ठेवतात.

दरम्यान, ठरावात असे म्हटले आहे की, या धर्मात स्वीकृती, परस्पर आदर आणि शांतता या मूल्यांसह विविध परंपरा आणि श्रद्धा प्रणालींचा समावेश आहे.

'काही शिक्षणतज्ञांनी हिंदूफोबियाला खतपाणी घातले'

प्रस्तावात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत देशातील अनेक भागांत हिंदू-अमेरिकनांवर द्वेषाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठरावानुसार, काही "हिंदू (Hindu) धर्माचा नाश करण्याचे समर्थन करणाऱ्या आणि त्याच्या पवित्र धर्मग्रंथांवर आणि सांस्कृतिक पद्धतींवर हिंसा आणि छळाचा आरोप करणाऱ्या शिक्षणतज्ञांमुळे हिंदूफोबियाला उत्तेजन मिळाले आहे."

अमेरिकन-हिंदू समुदायाचे विविध क्षेत्रात मोठे योगदान

ठरावात पुढे म्हटले आहे की, अमेरिकन-हिंदू समुदायाने वैद्यक, विज्ञान (Science) आणि अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, वित्त, शिक्षण, उत्पादन, ऊर्जा आणि रिटेल अशा विविध क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.

त्याचबरोबर, योग, आयुर्वेद, ध्यान, भोजन, संगीत आणि कला या क्षेत्रातील समुदायाच्या योगदानामुळे सांस्कृतिक जडणघडण समृद्ध झाली.

अटलांटा येथील फोर्सिथ काउंटीमधील लोकप्रतिनिधी लॉरेन मॅकडोनाल्ड आणि टॉड जोन्स यांनी हा प्रस्ताव मांडला होता. अटलांटामध्ये मोठ्या संख्येने हिंदू आणि भारतीय-अमेरिकन समुदायाचे लोक राहतात.

या संस्थेने प्रस्ताव आणण्यात पुढाकार घेतला

या प्रस्तावाबाबत पुढाकार 'कोलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका' (COHNA) च्या अटलांटा युनिटने घेतला आहे.

त्यांनी 22 मार्च रोजी 'जॉर्जिया स्टेट कॅपिटल' येथे ‘हिंदू एडवोकेसी डे’आयोजित केला होता. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक दोन्ही पक्षांच्या सदस्यांसह सुमारे 25 लोकप्रतिनिधींनी यात भाग घेतला.

COHNA चे उपाध्यक्ष राजीव मेनन म्हणाले की, "मॅकडोनाल्ड आणि जोन्स तसेच इतर लोकप्रतिनिधींसोबत काम करणे हा मोठा सन्मान आहे, ज्यांनी हा ठराव पास करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत आम्हाला मार्गदर्शन केले."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT