America: मेक्सीकोमधील कारागृहात गोळीबार, 14 जणांचा मृत्यू, तर 24 कैदी फरार

तुरुंगावरील हल्ल्यादरम्यान बंदूकधाऱ्यांनी चिलखती वाहनांचा वापर केला.
America
AmericaDainik Gomantak
Published on
Updated on

उत्तर अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी तुरुंगावर हल्ला केला. या हल्ल्यात 14 जणांचा मृत्यू झाला होता. वृत्तसंस्था एएफपीच्या म्हणण्यानुसार रविवारी उत्तर मेक्सिकन शहरातील सिउदाद जुआरेझमधील एका तुरुंगावर अज्ञात बंदुकधारींनी हल्ला केला. ज्यात 14 लोक ठार झाले आणि 24 कैदी पळून गेले.

चिहुआहुआ राज्य अभियोजकांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की हल्ल्यादरम्यान अज्ञात बंदुकधारींनी चिलखती वाहनांचा वापर केला. मृतांमध्ये 10 तुरुंग रक्षक आणि सुरक्षा दलालांचा समावेश आहे.

बंदुकधारींनी रविवारी उत्तर मेक्सिकन शहरातील सिउदाद जुआरेझ येथील तुरुंगावर हल्ला केला
ज्यात 14 लोक ठार झाले तर 24 कैदी पळून जाण्यात यशस्वी झाले, असे चिहुआहुआ राज्य अभियोक्ता कार्यालयाने सांगितले. निवेदनात म्हटले आहे की, हल्ल्याच्या काही वेळापूर्वी बुलेव्हार्डजवळ सशस्त्र लोकांनी महापालिका पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर हल्लेखोरांनी तुरुंगाबाहेरील सुरक्षा दलाच्या दुसऱ्या गटावर गोळीबार केला.

America
Lebanese Army News: तब्बल 232 स्थलांतरितांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले पण...

गोळीबारानंतर गोंधळ
मिळालेल्या माहितीनुसार, काही कैद्यांचे नातेवाईक नवीन वर्षाच्या निमित्ताने त्यांना भेटण्यासाठी कॅम्पसबाहेर थांबले होते. बंदुकधारी गोळीबाराच्या घटनेनंतर कारागृह आणि आसपासच्या परिसरात गोंधळाचे वातावरण होते. तुरुंगात काही दंगलखोर कैद्यांनी अनेक वस्तूंना आग लावली आणि तुरुंगाच्या रक्षकांशी झटापट केली, असे स्थानिक माध्यमांनी सांगितले. मात्र, 24 कैदी कसे पळून गेले हे अद्याप समजू शकलेले नाही. सध्या या हल्ल्यामागील कारण तपासले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com