Shooting Dainik Gomantak
ग्लोबल

Texas Shooting: टेक्सासमध्ये बंदूकधाऱ्याचा बेछूट गोळीबार, आठ वर्षांच्या मुलासह पाच जणांची हत्या!

Texas Shooting: अमेरिकेतील टेक्सासमध्ये शनिवारी एका बंदूकधाऱ्याने गोळ्या झाडून पाच जणांची हत्या केली.

Manish Jadhav

Texas Shooting: अमेरिकेतील टेक्सासमध्ये शनिवारी एका बंदूकधाऱ्याने गोळ्या झाडून पाच जणांची हत्या केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृतांमध्ये एका आठ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. टेक्सासमधील क्लीव्हलँडमध्ये ही घटना घडली आहे.

पोलिस (Police) अधिकाऱ्यांनी सांगितले की, बंदूकधारी त्याच्या परिसरात गोळीबार करत होता. झोपायला त्रास होत असल्याने शेजाऱ्याने त्याला तसे करण्यास मनाई केली. त्यामुळे संतप्त झालेल्या बंदूकधाऱ्याने आठ वर्षांच्या मुलासह पाच जणांवर गोळ्या झाडल्या.

सॅन जेसिंटो काउंटीचे शेरिफ ग्रेग केपर्स म्हणाले की, बंदूकधारी त्याच्या परिसरात रायफलने गोळीबार करत होता. लहान मूल झोपण्याचा प्रयत्न करत असल्याने शेजाऱ्याने त्याला गोळीबार थांबवण्यास सांगितले.

केपर्स पुढे म्हणाले की, बंदूकधाऱ्याने नंतर शेजाऱ्यांवर गोळीबार केला. घटनेच्या वेळी बंदूकधारी मद्यधुंद अवस्थेत होता. अधिकाऱ्याने सांगितले की, संशयित पीडितांच्या घरी रायफल घेऊन जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

दुसरीकडे, अमेरिकेत गोळीबाराच्या घटना अगदी सामान्य झाल्या आहेत. गन वायलेन्स आर्काइव्हनुसार, देशात आतापर्यंत किमान 174 सामूहिक गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत.

चार जणांच्या हत्येप्रकरणी 240 वर्षांची शिक्षा

दरम्यान, अमेरिकेतील (America) इंडियानापोलिस येथे गोळीबार करुन चार जणांची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या एका व्यक्तीला 240 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मार्सेल विल्स (20), ब्रॅक्सटन फोर्ड (21), जालेन रॉबर्ट्स आणि एक तरुणी किमारी हंट (21) या तीन तरुणांचा फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या गोळीबारात मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Third District: गोव्यात तिसरा जिल्हा झाल्यावर 'सरकारी कामे' वेळेत होणार का? की नोकऱ्यांत ओळखीची लोकं घुसणार..

Goa Court: गोव्यात अडीच वर्षांत 9727 खटले निकाली! फास्‍ट ट्रॅक कोर्टात 1504 खटले प्रलंबित

Goa Assmbly Live: विरोधक मागणीवर ठाम; पुन्हा गोंधळ

Rapan Fishing: चौथीच्या विद्यार्थ्यांनी ओढली रापण! होडी खेचून आणली किनाऱ्यावर; शाळेचा अभिनव उपक्रम

Government Job: लांबच लांब रांगा, वाहतूक कोंडी आणि गोंधळ! 100 पदांसाठी हजारोंची गर्दी, तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT