Kamala Harris Dainik Gomantak
ग्लोबल

चीनशी सामना करण्यासाठी अमेरिका तयार: कमला हॅरिस

सोमवारी सिंगापूरचे (Singapore) राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यासह दक्षिणपूर्व आशियाच्या दौऱ्याला सुरुवात केली.

दैनिक गोमन्तक

अमेरिकेच्या (America) उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris) यांनी सोमवारी सिंगापूरचे (Singapore) राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यासह दक्षिणपूर्व आशियाच्या दौऱ्याला सुरुवात केली. अफगाणिस्तानातून (US Afghanistan) अमेरिकन सैन्याच्या अशांत माघारीमुळे या भागातील प्रमुख सहयोगींशी संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने या भेटीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सिंगापूरनंतर हॅरिस व्हिएतनामला (Vietnam) जाणार आहेत.

दक्षिण आशियाई क्षेत्रामध्ये चीनच्या वाढत्या प्रभावाचा सामना करण्यासाठी सिंगापूर आणि व्हिएतनामसोबत सहकार्य वाढवण्याचे व्हिएतनाम दौऱ्याचे उद्दिष्ट आहे. या दरम्यान, त्या कोरोना महामारीला सामोरे जाण्याच्या प्रयत्नांबरोबरच आर्थिक आणि सुरक्षिततेशी संबंधित मुद्द्यांविषयी बोलू शकतात. हॅरिस यांनी इस्तानाच्या राष्ट्रपती भवनाबाहेर एका रिसेप्शनला हजेरी लावली. दरम्यान मार्चिंग बँडने अमेरिकन राष्ट्रगीत 'स्टार स्पॅन्गल्ड बॅनर' वाजवण्यात आले.

ली हिसिएन लूंग सांग यांनी बँडची पाहणी केली

त्यानंतर सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लुंग यांच्यासह त्यांनी बँडचे पर्यवेक्षण केले. या दरम्यान, लूंग यांनी त्यांना 'ऑर्किड' फुलाची एक प्रजाती दाखवली, ज्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे. पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय बैठकांची मालिका सुरू करण्यापूर्वी, उपराष्ट्रपतींनी सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्ष हलीमाह याकोब यांच्याशी संक्षिप्तपणे सौजन्यपूर्ण भेटही घेतली. उपराष्ट्रपतींच्या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदही त्या यावेळी घेतील. यानंतर, त्या 'चांगी नेव्हल बेस'वर जाणार आहेत, जिथे त्या' यूएसएस दुल्सा 'या लढाऊ जहाजावरील अमेरिकन खलाशांशी संवाद साधणार आहेत.

हॅरिस मंगळवारी भाषण देणार आहेत

हॅरिस मंगळवारी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्या प्रशासनाच्या दृष्टिकोनाची रूपरेषा मांडतील आणि पुरवठा साखळीच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी व्यापाऱ्यांना भेटतील. हॅरिस यांची ही दुसरी परदेश यात्रा आहे. जूनमध्ये त्या ग्वाटेमाला आणि मेक्सिकोला गेल्या होत्या. तसेच अमेरिकेचे उपराष्ट्रपती व्हिएतनामला भेट देण्याची ही पहिलीच वेळ असेल. त्यांची ही भेट अशा वेळी होत आहे, जेव्हा अफगाणिस्तान प्रकरणाबाबत अमेरिकेवर जगभरातून टीका होत आहे. सैन्य मागे घेण्याचा जो बायडन यांचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले जात आहे, कारण यानंतरच तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT