US President Joe Biden: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी शुक्रवारी देशात गर्भपात बंदीच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. दुसरीकडे मात्र, गर्भपाताच्या घटनात्मक अधिकारासंबंधी सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर त्यांनी टीका केली. परंतु लोकांनी या निर्णयामुळे खचून जाऊ नये, असे आवाहनही बायडन यांनी केले आहे. बायडन पुढे म्हणाले की, 'गर्भपाताचा अधिकार कायम ठेवण्याचा मार्ग म्हणजे राष्ट्रीय कायदा करणे आहे. त्यासाठी मतदान करण्याचे आव्हान आपल्यासमोर असणार आहे. विशेष म्हणजे, नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत.'
दरम्यान, जो बायडन (Joe Biden) यांनी सरकारी आदेशावर स्वाक्षरी केल्याने न्याय मंत्रालय आणि आरोग्य, मानव सेवा मंत्रालयाला महिलांना गर्भपात करण्यास किंवा गर्भपातावर पूर्णपणे बंदी नसलेल्या राज्यांमध्ये प्रवास करण्यास मनाई करण्याचा अधिकार दिला. अमेरिकेच्या काही राज्यांमध्ये अजूनही गर्भपाताला परवानगी आहे, परंतु त्यासाठी कठोर अटींचे पालन करावे लागते.
हा निर्णय बहुतेक अमेरिकन लोकांच्या मताच्या विरुद्ध होता
विशेष म्हणजे, 24 जून रोजी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) गर्भपाताला दिलेले घटनात्मक संरक्षण रद्द केले होते. न्यायालयाचा निर्णय हा 1973 मधील रो विरुद्ध वेड निर्णय कायम ठेवला पाहिजे या बहुतेक अमेरिकन लोकांच्या मताच्या विरुद्ध होता, ज्यामध्ये महिलांना (Women) गर्भपात करायचा की नाही हे ठरवण्याचा अधिकार होता. यामुळे अमेरिकेतील (America) महिलांना सुरक्षित गर्भपाताचा अधिकार मिळाला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.