Diwali Dainik Gomantak
ग्लोबल

दिवाळीचे फटाके अमेरिकेच्या संसदेत; 'नॅशनल हॉलिडे' घोषित करण्याची केली मागणी

अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात दिवाळीच्या सुट्टीसाठी विधेयक (Federal Holiday on Diwali) मांडण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

जगभरात दिवाळीचा (Diwali) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देश विदेशातील भारतीय लोक आपल्या सण समारंभाच्या संस्कृतीमधून भारताची नव्याने ओळख घडवून देतात. त्यातच आता अमेरिकेच्या (America) प्रतिनिधीगृहात दिवाळीच्या सुट्टीसाठी विधेयक (Federal Holiday on Diwali) मांडण्यात आले आहे. न्यूयॉर्कच्या खासदार कॅरोलिन बी (Caroline b) यांच्या नेतृत्वाखालील खासदारांनी बुधवारी ही घोषणा केली. दरम्यान त्यांनी सांगितले की, दिवाळीला दिव्यांचा सण म्हणून फेडरल सुट्टी घोषित करण्यात यावी, यासाठी प्रतिनिधी सभागृहात एक खास विधेयक मांडण्यात आले आहे." भारतीय कॉकसच्या सदस्यांसोबत या आठवड्यात दिपावली दिवस अधिनियम (Diwali Day Act) आणताना मला खूप आनंद झाला आहे. आणि त्यामुळे दिवाळी कायद्यानुसार एक फेडरल सुट्टी होईल," असं मॅलोनी यांनी एका कार्यक्रमादरम्यान म्हटले.

हे ऐतिहासिक विधेयक मांडण्यात भारतीय-अमेरिकन खासदार राजा कृष्णमूर्ती यांच्यासह अनेक खासदारांचा सहभाग आहे. कृष्णमूर्ती यांनी यूएस काँग्रेसमध्ये दिवाळी, दिव्यांचा सण (US Diwali a Holiday in USA) याचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व ओळखून ठराव मांडला आहे. मॅलोनी म्हणाले की, यंदाची दिवाळी कोविड-19 च्या अंधारातून देशाच्या प्रगतीचे प्रतीक आहे. 'अंधारावर प्रकाशाचा विजय, वाईटावर चांगल्याचा विजय आणि अज्ञानावर ज्ञानाचा प्रकाश. आणि म्हणूनच हा सण आपल्यासोबत साजरे करताना मला अभिमान वाटतो.'

जगभरातील भारतीयांचा आदर

तत्पूर्वी, प्रतिनिधी सभागृहात ठराव मांडल्यानंतर, कृष्णमूर्ती म्हणाले की, दिवाळीचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व ओळखून हा ठराव भारतीय-अमेरिकन आणि जगभरातील डायस्पोरा या महत्त्वाच्या प्रसंगी (US Diwali a Public Holiday) यांच्याबद्दल मनापासून आदर व्यक्त करतो. कृष्णमूर्ती म्हणाले की, "दिवाळीचे प्रचंड धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व ओळखून हा ठराव मांडताना मला अभिमान वाटतो."

'अंधारावर प्रकाशाचा विजय'

ते पुढे म्हणाले, 'कोरोना काळात आणखी एक दिवाळी साजरी करताना, मला आशा आहे की, आपण जगात अंधारावर प्रकाशमय विजय संपादन करु (Diwali Celebration in US). आपापल्या घरी दिवा लावून दिवाळी साजरी करण्यासाठी जमलेल्या कुटुंबांना मी सुरक्षित आणि आनंदी दिवाळीच्या शुभेच्छा देऊ इच्छितो आणि सर्वांना चांगले आरोग्य आणि शांती लाभो.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

Goa Protests: गोव्यात पाच वर्षांत 42 आंदोलने; 2025 मध्ये सर्वाधिक 15! आंदोलनांशी संबंधित गुन्ह्यांत 2024 आघाडीवर, 7 एफआयआर दाखल

VIDEO: हवेतच विमानाचं टायर फुटलं, इंजिनमध्ये घुसले रबराचे तुकडे अन्..., इराणमध्ये बोइंग 737 चं थरारक इमर्जन्सी लँडिंग; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT