US, Israel Attack Iran Dainik Gomantak
ग्लोबल

US-Israel Attacks Iran: अमेरिका- इस्रायलचा इराणवर हल्ला! 148 मुलींचा मूत्यू, सगळीकडे रक्ताचा सडा Watch Video

US, Israel Attack Iran Video: मध्यपूर्वेतील संघर्ष आता अत्यंत हिंसक वळणावर पोहोचला असून, अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त लष्करी मोहिमेत इराणला मोठा फटका बसला आहे.

Sameer Amunekar

मध्यपूर्वेतील संघर्ष आता अत्यंत हिंसक वळणावर पोहोचला असून, अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त लष्करी मोहिमेत इराणला मोठा फटका बसला आहे. इराणच्या दक्षिण होर्मोजगन प्रांतातील मिनाब शहरात असलेल्या मुलींच्या प्राथमिक शाळेवर झालेल्या भीषण हल्ल्यात १४८ जणांचा मृत्यू झाला, कालपर्यंत ही आकडेवारी ४०वर होती. यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. इराणची अधिकृत वृत्तसंस्था 'आयआरएनए'ने (IRNA) या घटनेला दुजोरा दिला असून, या हल्ल्यामुळे संपूर्ण जगात संतापाची लाट उसळली आहे.

मिनाबमधील लष्करी तळावरून संघर्षाचा भडका

मिनाब हे शहर इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स'चे (IRGC) मुख्य केंद्र मानले जाते. याच तळाला लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात शेजारील शाळेवर हा हल्ला झाल्याचे समजते. शनिवारच्या पहाटेपासून इस्रायलने तेहरानसह इराणच्या अनेक महत्त्वाच्या शहरांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला आहे.

या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून इराणने 'ऑपरेशन एपिक फ्यूरी' (Operation Epic Fury) जाहीर केले असून, इस्रायलसह कतार, कुवैत, बहारिन आणि सौदी अरेबियामधील अमेरिकन लष्करी तळांवर प्रतिहल्ले सुरू केले आहेत.

दुबईसह आखाती देशांत उड्डाणे ठप्प

इराणने युएईमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या दुबई शहरालाही लक्ष्य केले आहे. या सततच्या हल्ल्यांमुळे सौदी अरेबियाने बहारिन, कतार आणि जॉर्डनवरील आक्रमणाचा तीव्र निषेध केला आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह आखाती देशांतील सर्व विमानतळे बंद करण्यात आली असून पुढील सूचनेपर्यंत सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

इस्रायलमध्ये आणीबाणी

दुसरीकडे, इराणकडून होणाऱ्या ड्रोन आणि मिसाइल हल्ल्यांच्या भीतीने इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी देशभर आणीबाणी घोषित केली आहे. इस्रायलमधील शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात आली असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इस्पितळांमधील रुग्णांना सुरक्षित बंकरमध्ये हलवण्यात आले असून संपूर्ण शहरात सायरनचा थरकाप ऐकायला मिळत आहे. सुरक्षा दलांच्या हालचाली सुलभ व्हाव्यात यासाठी रस्त्यांवरील खासगी वाहतुकीवरही निर्बंध लादण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT