Donald Trump and mojtaba khameni Dainik Gomantak
ग्लोबल

Iran US War Ceasefire: 40 दिवसांचा रक्तरंजित संघर्ष थांबला! इराण-अमेरिका यांच्यात युद्धविराम; पण 'त्या' 10 अटींवरुन जगात खळबळ

Iran US War Ceasefire April 2026: गेल्या 40 दिवसांपासून सुरु असलेल्या इराण-अमेरिका यांच्यातील रक्तरंजित संघर्षाला अखेर तात्पुरता पूर्णविराम मिळाला.

Manish Jadhav

Iran US Negotiations : गेल्या 40 दिवसांपासून सुरु असलेल्या इराण-अमेरिका यांच्यातील रक्तरंजित संघर्षाला अखेर तात्पुरता पूर्णविराम मिळाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत दोन आठवड्यांच्या 'युद्धविरामा'ची घोषणा केली. या ऐतिहासिक निर्णयामुळे जागतिक स्तरावर मोठा दिलासा मिळाला असून मध्यपूर्वेतील तणाव निवळण्याची चिन्हे आहेत. मात्र, या युद्धविरामाच्या कारणांवरुन दोन्ही देशांनी आपापल्या विजयाचे दावे केले.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' पोस्टद्वारे या निर्णयाची माहिती दिली. ट्रम्प यांनी नमूद केले की, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी इराणवर होणारे विनाशकारी हल्ले थांबवण्याची विनंती केली होती. इराणने 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' (होर्मुजची सामुद्रधुनी) सुरक्षितपणे पूर्ण उघडण्याचे मान्य केल्यामुळे पुढील दोन आठवड्यांसाठी युद्धविराम करण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या मते, अमेरिकेने आपले सर्व लष्करी उद्दिष्टे पूर्ण केली असून इराणने दिलेला 10 कलमी प्रस्ताव चर्चेसाठी व्यवहार्य आधार आहे. या दोन आठवड्यांच्या काळात प्रलंबित मुद्द्यांवर तोडगा काढून दीर्घकालीन शांतता करार पूर्ण करण्याचा अमेरिकेचा मानस आहे.

दुसरीकडे, इराणचे (Iran) परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी या शस्त्रसंधीला इराणचा नैतिक विजय मानले. अराघची यांनी 'एक्स'वर पोस्ट करत पाकिस्तानच्या नेतृत्वाचे आभार मानले. त्यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेने स्वतःच्या 15 कलमी प्रस्तावावर चर्चा करण्याची विनंती केली आणि इराणच्या 10 कलमी प्रस्तावाचा आराखडा मान्य केला, म्हणूनच इराण शस्त्रसंधीस तयार झाला. जर अमेरिकेने हल्ले थांबवले, तर इराणच्या सशस्त्र सेना आपली बचावात्मक कारवाई थांबवतील. तसेच, इराणच्या समन्वयाने 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधून पुढील दोन आठवड्यांसाठी सुरक्षित मार्ग दिला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.

इराणने या शस्त्रसंधीसाठी अमेरिकेसमोर (America) 10 कडक अटी ठेवल्या आहेत. यामध्ये इराणवर पुन्हा कधीही हल्ला न करण्याची गॅरंटी, होर्मुज सामुद्रधुनीवर इराणचेच नियंत्रण राहणे, युरेनियम समृद्धीकरणाला मान्यता देणे आणि इराणवरील सर्व प्राथमिक व द्वितीयक निर्बंध हटवणे यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, संयुक्त राष्ट्रांचे सर्व जुने ठराव रद्द करणे, युद्धातील नुकसानीची भरपाई अमेरिकेने देणे, मध्यपूर्वेतून अमेरिकन सैन्य मागे घेणे आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाविरोधातील युद्ध थांबवणे यांसारख्या अटींचाही यात समावेश आहे. अमेरिकेने या अटींच्या चौकटीत चर्चा करण्याचे मान्य केल्याचे इराणचे म्हणणे आहे. 40 दिवसांच्या या युद्धानंतर झालेली ही शस्त्रसंधी खरोखरच शांततेत रुपांतरित होते की ही केवळ पुढच्या संघर्षाची तयारी आहे, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT