donald trump and mojtaba khamenei Dainik Gomantak
ग्लोबल

US Iran War: डोनाल्ड ट्रम्पचा 'डेंजरस' इशारा! इराणचाही चर्चेला नकार आणि युद्धाची ललकारी; घालिबाफ म्हणाले, "धमक्यांनी इराण दबणार नाही!"

Donald Trump Bombing Threat Iran : इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता एका अत्यंत स्फोटक वळणावर पोहोचला.

Manish Jadhav

Donald Trump Bombing Threat Iran: इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता एका अत्यंत स्फोटक वळणावर पोहोचला. पाकिस्तानमध्ये या आठवड्यात नियोजित असलेल्या शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीचे भविष्य आता अनिश्चिततेच्या गर्तेत अडकले. गेल्या आठवड्याच्या शेवटी अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ इराणी ध्वज असलेले एक जहाज जप्त केल्यामुळे तेहरानमधील अधिकारी चांगलेच संतापले. या कारवाईनंतर इराणने या चर्चेला उपस्थित न राहण्याची धमकी दिली. अमेरिका आणि इराण यांच्यात झालेली दोन आठवड्यांची शस्त्रसंधी बुधवारी संपुष्टात येत असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही मुदत वाढवण्याची शक्यता नाकारली.

इराणच्या (Iran) मते, अमेरिकेने नाकेबंदी आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन तणाव आणखी वाढवला. इराणचे प्रभावशाली संसद अध्यक्ष आणि मुख्य वार्ताहर मोहम्मद बागेर घालिबाफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, "आम्ही धमक्यांच्या छायेत कोणत्याही वाटाघाटी स्वीकारणार नाही. जर युद्ध पुन्हा सुरु झाले, तर आमच्याकडे रणांगणात दाखवण्यासाठी नवीन 'पत्ते' तयार आहेत." घालिबाफ यांनी केवळ अमेरिकेलाच नव्हे तर इस्रायललाही इशारा दिला की, इराण युद्धासाठी पूर्णपणे सज्ज आहे.

दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी चर्चेबाबत आपली कठोर भूमिका कायम ठेवली. 'पीबीएस न्यूज'शी बोलताना ट्रम्प यांनी एक भयावह इशारा दिला. शस्त्रसंधी संपली आणि चर्चेत कोणताही तोडगा निघाला नाही तर काय होईल, या प्रश्नावर ट्रम्प म्हणाले, "तर मग अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट व्हायला सुरुवात होईल." अमेरिकेने आपली टीम पाकिस्तानला पाठवण्याची तयारी केली असून यामध्ये उपराष्ट्राध्यक्ष जेडी वान्स, मध्य पूर्व विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जॅरेड कुशनर यांचा समावेश आहे. ट्रम्प यांच्या मते, चर्चेसाठी आम्ही तयार आहोत, पण जर इराण तिथे आला नाही, तरी आम्हाला काही फरक पडत नाही.

होर्मुझची सामुद्रधुनी हा सध्या दोन्ही देशांमधील वादाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला. जागतिक तेल पुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या या जलमार्गावरुन दोन्ही बाजूंकडून कुरघोडीचे प्रयत्न सुरु आहेत. पाकिस्तानमधील मध्यस्थांनी ट्रम्प प्रशासनाला सार्वजनिक विधाने करताना संयम बाळगण्याचा सल्ला दिला. इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, ट्रम्प यांची सार्वजनिक विधाने आणि अमेरिकेने केलेली नाकेबंदी या दोन गोष्टी शांतता चर्चेसाठी सर्वात मोठा अडथळा ठरत आहेत. इराणचे म्हणणे आहे की, दोन्ही देश कराराच्या अगदी जवळ होते, परंतु ट्रम्प यांच्या टोकाच्या भूमिकेमुळे राजनैतिक प्रगती धोक्यात आली.

आता जगाचे लक्ष बुधवारी संपणाऱ्या शस्त्रसंधीकडे लागले आहे, कारण त्यानंतर पश्चिम आशियात शांतता नांदणार की युद्धाचा भडका उडणार, हे स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT