IM-1 Mission| NASA|SpaceX|Intuitive Machines X, @NASA
ग्लोबल

IM-1 Mission: ऐतिहासिक! खासगी कंपनीचे चंद्रावर पाऊल, पहिले व्यावसायिक लँडिंग दणक्यात

Intuitive Machines: गेल्या वर्षी एका जपानी खासगी कंपनीनेही चंद्रावर आपले मिशन पाठवले होते, मात्र ते लँडिंगदरम्यान क्रॅश झाले. आता इंट्यूटिव्ह मशिन्सने हे यश मिळवले आहे.

Ashutosh Masgaunde

US Intuitive Machines robotic spacecraft lander Odysseus has successfully landed on the moon, Intuitive Machines has become the world's first private company to land on the moon:

अमेरिकेतील खाजगी कंपनी इंट्यूटिव्ह मशिन्सचे रोबोटिक स्पेसक्राफ्ट लँडर ओडिसियसचे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाले आहे. अमेरिकन कंपनी Intuitive Machines ही चंद्रावर उतरणारी जगातील पहिली खासगी कंपनी ठरली आहे.

इंट्युटिव्ह मशिन्सच्या IM-1 Mission ने हा पराक्रम गाजवला असून, त्याची आता इतिहासाच्या पानांमध्ये नोंद झाली आहे. विशेष बाब म्हणजे अपोलो युगानंतर पहिल्यांदाच अमेरिका आधारित मिशन चंद्रावर उतरले आहे.

Intuitive Machines या वेबसाईटनुसार, IM-1 मोहिमेअंतर्गत पाठवण्यात आलेल्या ओडिसियस नावाच्या लँडरने चंद्रावर पाऊल ठेवले आहे.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह अल्टेमस म्हणाले, “आम्ही चंद्राच्या पृष्ठभागावर आहोत आणि प्रसारण करत आहोत. चंद्रावर आपले स्वागत आहे."

आजपर्यंत चंद्रावर झेपावलेल्या सर्व मोहिमा सरकारी संस्थांच्या मोहिमा होत्या. काही दशकांपूर्वी, जेव्हा मानव चंद्रावर पोहोचला तेव्हा अमेरिकन अंतराळ संस्था नासाने ती मोहीम यशस्वी केली होती.

रशिया आणि चीनच्या सरकारी संस्थांनीही चंद्रावर आपली मोहीम पाठवली आहे. गेल्या वर्षी, भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेने चंद्रावर यशस्वी लँडिंग केले होते.

शुक्रवारी, खासगी कंपनीच्या मून लँडरने चंद्रावर पाऊल ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. 2019 मध्ये इस्त्रायली कंपनीने पहिल्यांदा हा प्रयत्न केला होता, पण तो अयशस्वी झाला.

गेल्या वर्षी एका जपानी खासगी कंपनीनेही चंद्रावर आपले मिशन पाठवले होते, मात्र ते लँडिंगदरम्यान क्रॅश झाले. आता इंट्यूटिव्ह मशिन्सने हे यश मिळवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिशन कंट्रोलशी संबंधित अभियंते शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून राहिले. नियोजित लँडिंगनंतर काही मिनिटांपर्यंत लँडिंगची खात्री झाली नव्हती. अभियंते पुन्हा लँडरशी संवाद साधत होते. अखेरीस एक सिग्नल प्राप्त झाला, ज्याने लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्याची मेसेज दिला.

IM-1 मिशन विक्रमी 8 दिवसात चंद्रावर पोहोचले. 15 फेब्रुवारी रोजी, स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकेटच्या मदतीने त्याने उड्डाण केले.

सुमारे 50 वर्षांपूर्वी अपोलो मोहीम ज्या मार्गाने पाठवण्यात आली होती त्याच मार्गाने ही मोहीम चंद्रावर गेली होती. या मोहिमेसाठी अमेरिकन अंतराळ संस्था नासाने कंपनीसोबत सुमारे हजार कोटी रुपयांचा करार केला होता.

चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर, आता ओडिसियस लँडर 7 दिवस काम करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

International Purple Festival 2025: 9 ऑक्टोबरपासून पणजीत रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल, नोंदणी अनिवार्य; जाणून घ्या स्थळ, थीम आणि प्रमुख आकर्षणे

Viral Video: स्टाईल मारत रील बनवणाऱ्या कपलचा जीवावर बेतणारा थरार व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, 'लो भाई हो गया कांड'!

Goa Crime: पणजीत खळबळ! बसस्थानकाजवळ आढळला छत्तीसगडच्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह; परिसरात भीतीचे वातावरण

AUS W vs PAK W: भारतीय वंशाच्या अलाना किंगची कमाल, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रचला नवा इतिहास; मोडला 22 वर्ष जुना रेकॉर्ड

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

SCROLL FOR NEXT