US Restaurant Human Finger Incident Dainik Gomantak
ग्लोबल

US Restaurant: सॅलडमध्ये सापडलं माणसाचं बोट, ग्राहकला बसला मोठा धक्का; जाणून घ्या नेमकं प्रकरण

US Restaurant Human Finger Incident: अमेरिकेतील कनेक्टिकट (न्यूयॉर्क) इथे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

Manish Jadhav

US Restaurant Human Finger Incident: अमेरिकेतील कनेक्टिकट (न्यूयॉर्क) इथे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. कनेक्टिकटमधील एका रेस्टॉरंटमध्ये सर्व्ह केलेले सॅलड ग्राहकांसाठी दुःस्वप्न बनले. असे घडले की, ग्रीनविचमधील अ‍ॅलिसन कोजी नावाच्या महिला ग्राहकाला सॅलड देण्यात आले तेव्हा त्या सॅलडमध्ये माणसाच्या बोटाचा तुकडा सापडला. या प्रकरणानंतर पीडित अॅलिसन कोजीने रेस्टॉरंटविरोधात तक्रार दाखल केली.

आरोपांमध्ये पीडितेने सांगितले की, तिने यावर्षी एप्रिल महिन्यात (2023) न्यूयॉर्कमधील माउंट किस्को येथील चोप्ट येथून सॅलड खरेदी केले होते. या प्रकरणात करण्यात आलेल्या आरोपांनुसार, महिलेने सांगितले की, सॅलड खाताना तिच्या लक्षात आले की, ती सॅलडसोबत माणसाच्या बोटाचा तुकडा चावत आहे. या आरोपानंतर, वेस्टचेस्टर काउंटी आरोग्य विभागाने कथित घटनेची चौकशी सुरु केली.

बोटाचा तुकडा रेस्टॉरंट मॅनेजरचा होता

रिपोर्ट्सनुसार, माणसाच्या बोटाचा तुकडा रेस्टॉरंट मॅनेजरचा होता. तक्रारीत असे म्हटले आहे की, रेस्टॉरंटचा मॅनेजर रॉकेटची पाने (हिरव्या भाज्यांचा एक प्रकार) कापत होता. त्याच क्षणी त्याच्या डाव्या हाताच्या तर्जनीचा एक भाग चुकून कापला गेला. यानंतर, तोच भाग सॅलडमध्ये मिसळला गेला आणि महिलेला दिला गेला. बोट कापल्यानंतर मॅनेजरला डॉक्टरकडे जावे लागले, असेही तक्रारीत म्हटले आहे. वेस्टचेस्टर काउंटी आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, महिलेच्या वतीने तक्रार दाखल केल्यानंतर रेस्टॉरंटला $ 900 दंड ठोठावण्यात आला. फिर्यादीत केलेल्या आरोपांमध्ये कोजी यांनी सांगितले की, फिंगर सॅलड खाल्ल्यामुळे त्यांना धक्का बसला. त्यांनी मान आणि खांदे दुखत असल्याची तक्रार केली आहे.

यापूर्वीही घटना घडल्या आहेत

Chopt Creative Salad कंपनी अमेरिकेत 70 पेक्षा जास्त ठिकाणी सॅलड विकते. 2016 मध्ये, कॅलिफोर्नियातील एका गर्भवती महिलेने दावा केला की, तिला पासो रॉबल्स येथील ऍपलबीच्या रेस्टॉरंटमधील सॅलडमध्ये रक्ताने माखलेली बोटे सापडली होती. 2012 मध्ये, मिशिगनच्या एका किशोरवयीन मुलाने सांगितले की, जेव्हा त्याने त्याच्या आर्बीच्या रोस्ट बीफ सँडविच कापले तेव्हा त्याला एक बोट सापडले - ज्यामध्ये डुकराचे मांस देखील होते. 2010 मध्ये, फ्लोरिडाच्या एका महिलेने तळलेले चिकन ग्रीन सॅलडमध्ये माणसाचे बोट सापडल्याचे सांगितले. कापलेले डोके सापडले, ज्यानंतर त्याने तक्रार केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session:राज्यात अनेक घर फोड्या करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केलेल्या आरोपीला अटक

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

GIDC:‘आयडीसी’च्या संचालकांवर गुन्हे नोंदवा! फेरेरांची मागणी; वित्तीय शिस्त न पाळल्याचा ठेवला ठपका

Ferry Boat Repair: फेरीबोटींवर 35 कोटींपेक्षा अधिक खर्च! आकडेवारीत विसंगती असल्याचा दावा; युरी-फळदेसाई यांच्यात जुंपली

Goa Politics: खरी कुजबुज; गोव्यातील ठेकेदार सुटले कसे?

SCROLL FOR NEXT