US Airstrike on IRGC Headquarters Tehran Dainik Gomantak
ग्लोबल

US Iran War: डेडलाईन संपण्यापूर्वीच अमेरिकेचा मोठा हल्ला! इराणी सैन्याचं अंडरग्राउंड हेडक्वार्टर उद्ध्वस्त; बंकर-बस्टर बॉम्बच्या वर्षावानं चुकला काळजाचा ठोका

US Airstrike on IRGC Headquarters Tehran: अमेरिकेने इराणला मोठा दणका देत तेहरानमधील 'इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स'च्या एका अतिशय सुरक्षित आणि गुप्त भूमिगत मुख्यालयावर जबरदस्त हवाई हल्ला केला.

Manish Jadhav

US Airstrike on IRGC Headquarters Tehran: मध्यपूर्वेतील युद्ध आता एका अत्यंत विनाशकारी वळणावर पोहोचले आहे. अमेरिकेने इराणला मोठा दणका देत तेहरानमधील 'इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स'च्या एका अतिशय सुरक्षित आणि गुप्त भूमिगत मुख्यालयावर जबरदस्त हवाई हल्ला केला. या हल्ल्यात अमेरिकेने आपल्या ताफ्यातील सर्वात प्रगत 'बंकर-बस्टर' बॉम्बचा वापर केला असून यामुळे जमिनीच्या शेकडो फूट खाली असलेले इराणचे लष्करी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे वृत्त आहे. अमेरिकेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे इराणमध्ये मोठी खळबळ उडाली.

हे थरारक ऑपरेशन अमेरिकन सेंट्रल कमांडचे प्रमुख ॲडमिरल ब्रॅड कूपर यांच्या आदेशावरुन पार पडले. विशेष म्हणजे, यासाठी अमेरिकेने आपल्या अत्यंत घातक अशा 'B-2 स्टेल्थ बॉम्बर्स'चा वापर केला. या विमानांनी लांब पल्ल्याचा प्रवास करुन थेट तेहरानमधील IRGC च्या त्या गुप्त ठिकाणाला लक्ष्य केले, जिथे वरिष्ठ लष्करी कमांडर महत्त्वाची बैठक घेत होते. अहवालांनुसार, अमेरिकेने (America) येथे 'डबल स्ट्राईक' रणनीतीचा वापर केला. पहिल्या हल्ल्यानंतर जेव्हा मदत आणि बचाव कार्य सुरु झाले, तेव्हाच दुसरा भीषण स्फोट घडवून आणण्यात आला. यामुळे अनेक इराणी कमांडर आणि बचाव पथकातील कर्मचारी मारले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इराणने आपले अणूप्रकल्प आणि लष्करी तळ हवाई हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी जमिनीखाली मोठ्या बंकरमध्ये हलवले होते. मात्र, अमेरिकेच्या बंकर-बस्टर बॉम्बने हे सुरक्षा कवच भेदले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या कडक इशाऱ्यानंतर हा हल्ला झाला आहे. ट्रम्प यांनी धमकी दिली होती की, जर इराणने (Iran) आपल्या कारवाया थांबवल्या नाहीत, तर त्यांना एका रात्रीत संपवले जाईल. त्यांनी होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी बुधवारपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता, परंतु ही मुदत संपण्यापूर्वीच अमेरिकेने इराणवर हा मोठा हल्ला चढवून आपले इरादे स्पष्ट केले आहेत.

अमेरिकेचे युद्ध सचिव पीट हेगसेथ यांनी मंगळवारी स्पष्ट केले की, इराणवर सुरु असलेले हे हल्ले केवळ सुरुवात आहे. येत्या काही दिवसांत हे हल्ले अधिक भयावह आणि विनाशकारी होऊ शकतात. अमेरिकेने इराणची ऊर्जा केंद्रे, गॅस आणि पाणीपुरवठा यंत्रणाही उद्ध्वस्त करण्याची तयारी केली आहे. या कारवाईमुळे इराणच्या लष्करी शक्तीला मोठा तडा बसला असून संपूर्ण मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता इराण यावर काय प्रतिक्रिया देतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji Municipal Garden: काँक्रिटच्या विळख्यात पणजीची हिरवाई जपणारं एक अद्भूत स्थान; 'जार्दिम गार्सिया द ओर्ता'

Pakistan ODI Cricket Record: वनडे क्रिकेटमधील लाजिरवाणा रेकॉर्ड; एकाच डावात 6 फलंदाज 'डक'वर आऊट, क्रिकेट विश्वात पाकड्यांची पुन्हा नाचक्की

Crime News: 15 व्या वर्षी लग्न, दोनदा तीन तलाक अन् हलालाचा 'नरक'! लैंगिक शोषणाच्या प्रकरणावर हाय कोर्टाने ओढले ताशेरे; म्हणाले, 'अशा प्रथा...'

Shukra Chandra Yuti 2026: 16 जुलैला आकाशात महासंयोग! शुक्र-चंद्राची युती 'या' 5 राशींना बनवणार करोडपती; लव्ह लाईफमध्येही मिळणार गूड न्यूज

PF New Rules Update: एक चुकीचा निर्णय अन् निवृत्तीचा फंड धोक्यात! इपीएफओचा नवा 1800 रुपयांचा नियम; जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT