Cyclone Melissa Video Dainik Gomantak
ग्लोबल

Hurricane Melissa Video: 'हरीकेन हंटर्स'ची धाडसी मोहीम! मेलिसा चक्रीवादळाच्या केंद्रातून केले जीवघेणे उड्डाण; पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

Cyclone Melissa Video: अमेरिकेच्या वायुसेनेतील एका विशेष पथकाने अत्यंत अविश्वसनीय आणि धोकादायक कामगिरी केली.

Manish Jadhav

Cyclone Melissa Video: अमेरिकेच्या वायुसेनेतील एका विशेष पथकाने अत्यंत अविश्वसनीय आणि धोकादायक कामगिरी केली. या टीमने आपल्या विमानाने थेट 'मेलिसा' (Melissa) चक्रीवादळाच्या केंद्रातून (Eye of the Hurricane) उड्डाण केले. या थरारक उड्डाणाचा व्हिडिओ आता समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही चकित व्हाल.

'हरीकेन हंटर्स' (Hurricane Hunters) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या वायुसेनेच्या 53व्या वेदर रिकॉनिसन्स स्क्वॉड्रनच्या (53rd Weather Reconnaissance Squadron) या टीमने जमैकामध्ये धडकण्यापूर्वी या वादळाच्या मध्यभागी प्रवेश केला. 1851 नंतर जमैका बेटावर धडकलेले हे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ आहे.

थरारक व्हिडिओ

अमेरिकी वायुसेना या चक्रीवादळावर (Cyclone) बारीक लक्ष ठेवून आहे. 'मेलिसा' वादळ जमैकाकडे सरकत असताना अमेरिकेच्या एअरफोर्सच्या विमानाने हा खास व्हिडिओ चित्रित केला. हा व्हिडिओ जारी करताना, "वादळाच्या आतमध्ये नेमके कसे दृश्य असते, ते बघा," असे सांगण्यात आले. @FlynonymousWX या सोशल मीडिया हँडलने हा व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले, "अटलांटिक महासागरातील कॅटेगरी 5 (Category 5) च्या मेलिसा चक्रीवादळाच्या केंद्रातील हे अद्भुत दृश्य आहे. हे या वर्षातील पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ आहे."

मेलिसाची विनाशकारी शक्ती

हवामान शास्त्रज्ञांच्या मते, 'मेलिसा' वादळामुळे विनाशकारी पूर, भूस्खलन (Landslides) आणि मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. हे वादळ कॅटेगरी 5 (Category 5) मध्ये बदलले आहे, जो चक्रीवादळाचा सर्वात धोकादायक प्रकार आहे.

  • वाऱ्याचा वेग: अमेरिकेच्या राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्राच्या ताज्या अपडेटनुसार, 'मेलिसा' वादळात वाऱ्याचा कमाल वेग 175 मैल (280 किलोमीटर) प्रतितास आहे.

  • ऐतिहासिक विध्वंस: या वादळामुळे 2017 मधील मारिया (Maria) किंवा 2005 मधील कॅटरिना (Katrina) यांसारख्या ऐतिहासिक चक्रीवादळांच्या पातळीचा विध्वंस होण्याची भीती आहे.

जमैकाचे पंतप्रधान अँड्र्यू होलनेस यांनी या वादळाच्या भीतीमुळे लोकांना सुरक्षित स्थळी हलवताना म्हटले, "मी जैमाकावासीयांना आवाहन करतो की, त्यांनी तात्काळ सुरक्षित स्थळी जावे." या वादळाने जमैकामध्ये धडकण्यापूर्वीच हैतीमध्ये किमान 3 लोक आणि डोमिनिकन रिपब्लिकमध्ये एका व्यक्तीला फटका बसला. जमैकामध्येही आतापर्यंत तीन लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Honda 0 Series EV: होंडाची EV सेगमेंटमध्ये 'धमाल'! 'झीरो सीरिज'मधील 'ही' दमदार SUV लवकरच भारतात होणार लॉन्च; टाटा नेक्सॉनला देणार कडवी टक्कर

Viral Video: दूध सांडले, पाणी सांडले, मार मात्र एकालाच! आई-मुलाच्या वादाचा मजेदार VIDEO व्हायरल, नेटकऱ्यांनीही घेतली मजा; म्हणाले...

Cricket Controversy: क्रीडा विश्वात खळबळ! ब्रॉडच्या वडिलांनी ICC आणि BCCI वर केला गंभीर आरोप, 'टीम इंडिया'बद्दल केला मोठा खुलासा

IND vs AUS Head To Head Record: टी-20 चा खरा किंग कोण? भारत-ऑस्ट्रेलिया महासंग्राम बुधवारपासून! काय सांगतो हेड-टू-हेड रेकॉर्ड?

Goa Ration Shop: गोव्यातील रेशन दुकानदारांसाठी खूशखबर! 1 कोटींचे थकीत कमिशन मिळणार; केंद्राकडून निधी मंजूर

SCROLL FOR NEXT