UPI Payment | UPI Goes Global Dainik Gomantak
ग्लोबल

UPI in Foreign: आता परदेशातही वापरता येणार यूपीआय; सरकारकडून तयारी सुरू

UPI in Foreign: भारत सरकार या आखाती देशांबरोबर चर्चा करत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

UPI in Foreign: भारतातील अनेक नागरिक सौदी अरेबिया, बहरिन सारख्या आखाती देशात नोकरीच्या निमित्ताने जाताना दिसतात. आता भारताच्या या नागरिकांसाठी भारत सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम (एनपीसीआई) यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआई) चा विस्तार करण्यासाठी भारत सरकार या आखाती देशांबरोबर चर्चा करत आहे.

भारत शासनाच्या म्हणण्यानुसार, जर आखाती देशांमध्ये ही युपीआय सेवा जर सुरु झाली तर या देशात काम करणाऱ्या लाखों नागरिकांना मोठी मदत होणार आहे. भारतीय नागरिक वेळोवेळी आपल्या परिवाराला आपल्या कमाईचा काही हिस्सा पाठवत असतात.

ज्यामध्ये काहीवेळा तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. जर युपीआय सर्व्हीस जर आखाती देशात यशस्वी झाली तर भारतीय नागरिकांसाठी सोयीचे होणार असून त्यांना मोठी मदत होणार असल्याचे म्हटले जात आहे.

युपीआयच्या माध्यमातून सरहद्दीपार पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सिस्टिम तयार करण्यासाठी एनपीसीआय काही आखाती देशांबरोबर चर्चा करत आहे. ही चर्चा भारतीय रिझर्व्ह बॅंक, आखाती देशातील केंद्रीय बॅंक आणि आपल्या भारतीय मिशन कार्यालयामध्ये ही चर्चा झाल्याचे एनपीसीआयचे प्रबंध निदेशक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप अस्बे यांनी म्हटले आहे.

भारतातील युपीआयचे यश बघता इतर देशही युपीआय प्रणाली अवंलबण्यास उत्सुक असल्याचे दिसून येते. 2023मध्ये भारत आणि सिंगापूर ने अरब डॉलरच्या अधिक मनी ट्रान्सफर करण्यासाठी सुरक्षित आणि कमी व्याजदर असणारे य़ुपीआयला आपल्या राष्ट्रीय भुगतान प्रणालीसोबत जोडले आहे. युपीआय़ आपल्या देशात अवलंबणारा पहिला देश हा भूटान होता. त्यानंतर 2022 मध्ये नेपाळने ही प्रणाली आपल्या देशात अवलंबली होती,

दरम्यान, एनपीसीआयने सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनाडा, हॉगकॉंग, ओमान, कतर, अमेरिका, सौदी अरब, यूएईमधील एनआरआय जेव्हा भारतात येतील तेव्हा ते युपीआय प्रणाली वापरण्याची परवानगी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT